टोळ्या द्या अन्यथा वांगी गट कार्यालयासमोर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:30 IST2021-02-09T04:30:28+5:302021-02-09T04:30:28+5:30

वांगी : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कडेगाव तालुक्यातील सभासदांवर अन्याय होत आहे. येथील बहुतांशी सभासदांच्या ...

Give the gangs otherwise sit in front of the eggplant group office | टोळ्या द्या अन्यथा वांगी गट कार्यालयासमोर ठिय्या

टोळ्या द्या अन्यथा वांगी गट कार्यालयासमोर ठिय्या

वांगी : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कडेगाव तालुक्यातील सभासदांवर अन्याय होत आहे. येथील बहुतांशी सभासदांच्या उसाच्या नोंदी घेतल्या जात नाहीत आणि ऊसतोड मजुरांच्या पुरेशा टोळ्या दिल्या जात नाहीत. आता तात्काळ पुरवणी नोंदी घ्या आणि टोळ्या द्या अन्यथा वांगी येथील गट कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार आहे, असा इशारा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी दिला.

मोहिते यांनी सोमवारी वांगी आणि चिंचणी येथील गट कार्यालयास भेट दिली. यावेळी वांगी येथील कार्यालय बंद होते. ते ४० मिनिटांच्या प्रतीक्षेनंतर उघडण्यात आले. चिंचणी कार्यालयात फक्त दोनच कर्मचारी होते. गट कार्यालयासमोर मोहिते उभे राहिलेले दिसताच अनेक सभासद जमा झाले. मोहिते यांनी टोळ्या द्या अन्यथा गट कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला.

यावेळी रामचंद्र देशमुख, रमेश एडके, बाळासाहेब वत्रे, राजेंद्र मोहिते, सचिन दाईगंडे आदी उपस्थित होते.

फोटो ओळ : वांगी (ता. कडेगाव) येथील कृष्णा कारखान्याच्या गट कार्यालयास

कुलूप होते. यावेळी माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी अचानक भेट दिली.

Web Title: Give the gangs otherwise sit in front of the eggplant group office