वैद्यकीय महाविद्यालयात महाराष्ट्रीयनांना प्रवेश द्या

By Admin | Updated: September 23, 2016 00:34 IST2016-09-22T22:59:55+5:302016-09-23T00:34:13+5:30

राष्ट्रवादीची मागणी : अधिष्ठातांना निवेदन

Give admission to Maharashtrians in medical colleges | वैद्यकीय महाविद्यालयात महाराष्ट्रीयनांना प्रवेश द्या

वैद्यकीय महाविद्यालयात महाराष्ट्रीयनांना प्रवेश द्या

संजयनगर : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी प्राधान्य द्यावे, या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार यांच्या नेतृत्वाखाली भारती रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर. बी. कुलकर्णी यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखून आपण आपल्या राज्यातील हुशार, गरजू, इच्छुक व शेतकरी कुटुंबातील मुलांच्या भविष्याचा विचार करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी सीईटीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊनसुद्धा, त्यांनी ‘नीट’ची परीक्षा देऊन याच परीक्षेचे गुण ग्राह्य धरून प्रवेश दिला जात आहे. इतर राज्यांमध्ये त्यांच्याच राज्याच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते. आपणही राज्यातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी प्राधान्य द्यावे. या प्रमुख मागण्यांचे राहुल पवार यांचा नेतृत्वाखाली अधिष्ठाता डॉ. कुलकर्णी यांना देण्यात आले.
यावेळी उपाध्यक्ष सचिन जगदाळे, कईम शेख, मोहसीन सय्यद, रणजित पाटील, रवींद्र कदम, जीवन लोखंडे, पंकज बनसोडे, अमोल खचनाळे, वैभव पाटील, अक्षय अलकुंटे, सुजित पाटील, महावीर खोत, गिरीश पाटील यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी आदी उपस्थित होते़ (वार्ताहर)

Web Title: Give admission to Maharashtrians in medical colleges