मुलींनी आरोग्याबाबत जागरूक राहणे गरजेचे : वंदना पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:34 IST2021-06-09T04:34:26+5:302021-06-09T04:34:26+5:30
ओळ : सांगलीतील शांतिनिकेतन कन्याशाळेमध्ये आयाेजित ऑनलाइन कार्यशाळेत डॉ. वंदना पाटील यांनी मार्गदर्शन केले. लाेकमत न्यूज नेटवर्क सांगली : ...

मुलींनी आरोग्याबाबत जागरूक राहणे गरजेचे : वंदना पाटील
ओळ : सांगलीतील शांतिनिकेतन कन्याशाळेमध्ये आयाेजित ऑनलाइन कार्यशाळेत डॉ. वंदना पाटील यांनी मार्गदर्शन केले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शालेय वयापासूनच आरोग्याबाबत विद्यार्थिनींनी जागरूक राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ. वंदना पाटील यांनी केले.
सांगलीतील शांतिनिकेतन कन्याशाळेमध्ये मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन सप्ताहांतर्गत आयाेजित ऑनलाइन कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शिका म्हणून त्या बोलत होत्या. शालेय शिक्षण विभाग व युनिसेफ, मुंबई यांच्यातर्फे राबविण्यात येणाऱ्या या सप्ताहांतर्गत कन्याशाळेमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये डॉ. वंदना पाटील यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला. त्या म्हणाल्या. विद्यार्थिनींच्या बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक आरोग्य महत्त्वाचे आहे. मासिक पाळीच्या कालावधीत मुलींनी आरोग्याची व आहाराची काळजी घ्यावी. मासिक पाळीविषयीच्या काेणत्याही अंधश्रद्धांना बळी पडू नये.
डी. बी. सरगर यांनी स्वागत केले. या वेळी कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका समिता पाटील यांनीही मार्गदर्शन केले. या वेळी कन्याशाळेचे सर्व शिक्षक उपस्थित होते.