शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: कडेगाव येथे कुत्र्याच्या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू, खेळत असताना घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 18:34 IST

कडेगाव : कडेगाव येथील माळीनगर येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात प्रांजली राहुल माळी (वय ६, रा. माळीनगर, कडेगाव) या बालिकेचा ...

कडेगाव : कडेगाव येथील माळीनगर येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात प्रांजली राहुल माळी (वय ६, रा. माळीनगर, कडेगाव) या बालिकेचा मंगळवारी मृत्यू झाला.याबाबत अधिक माहिती अशी की, कडेगावातील माळीनगर येथे प्रांजली हिचे वडील राहुल माळी हे आपल्या कुटुंबीयांसह राहतात. शुक्रवारी (दि. १४) दुपारी साडेतीनच्या सुमारास प्रांजली ही तिच्या मोठ्या बहिणीसह शेजारी असलेल्या मैत्रिणीच्या घरी खेळण्यासाठी निघाली होती. यावेळी पाठीमागून आलेल्या पिसाळलेल्या कुत्र्याने प्रांजली हिच्या मानेला व गळ्याला चावा घेतला. त्यामुळे प्रांजली ही जमिनीवर कोसळली. मुलीचा आरडाओरडा ऐकून शेतात काम करीत असलेले प्रांजली हिचे वडील राहुल हे धावत आले; परंतु तोपर्यंत प्रांजली ही गंभीर जखमी झाली होती. वडील राहुल व नातेवाइकांनी तिला उपचारासाठी तत्काळ कडेगाव ग्रामीण रुग्णालय, कऱ्हाड येथील कृष्णा, सह्याद्री येथे प्राथमिक उपचारानंतर सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. येथे उपचार सुरू असताना मंगळवारी (दि. १८) दुपारी तिचा मृत्यू झाला.

कडेगाव शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी नागरिकांची मागणी आहे. त्याची नगरपंचायत प्रशासनाने दखल घेतली असून, याबाबत तत्काळ योग्य ती कार्यवाही केली जाईल. - डॉ. पवन म्हेत्रे, मुख्याधिकारी, नगरपंचायत, कडेगाव

टॅग्स :Sangliसांगलीdogकुत्राDeathमृत्यू