गिरी पार्श्वनाथ डोंगराचा विकास करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:24 IST2021-01-18T04:24:23+5:302021-01-18T04:24:23+5:30

या तीर्थक्षेत्राच्या भेटी दरम्यान ते बोलत होते. ते म्हणाले, कुंडल ग्रामपंचायत भाविकांच्या सोयीसाठी विकास आराखडा आखणार आहे. या जागेवरती ...

Giri will develop Parshwanath mountain | गिरी पार्श्वनाथ डोंगराचा विकास करणार

गिरी पार्श्वनाथ डोंगराचा विकास करणार

या तीर्थक्षेत्राच्या भेटी दरम्यान ते बोलत होते.

ते म्हणाले, कुंडल ग्रामपंचायत भाविकांच्या सोयीसाठी विकास आराखडा आखणार आहे. या जागेवरती जी विकास कामे होणार ती ग्रामपंचायत कुंडल व दोन ट्रस्ट यांच्या माध्यमातून होणार आहे. ग्रामपंचायत व ट्रस्टींच्या जागेवर इतरांना परवानगी शिवाय परस्पर काहीही करता येणार नाही. या जैन तीर्थ क्षेत्राच्या विकासासाठी ग्रामपंचायत कुंडल येथील स्थानिक ट्रस्टी सक्षम आहेत. काही दिवसातच ग्रामपंचायत व ट्रस्ट यांची बैठक होऊन त्यामध्ये पुढील दिशा ठरवली जाईल. तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी आमदार अरूण लाड, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, पालकमंत्री जयंत पाटील, महेंद्र लाड, राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब पवार, जि.प.सदस्य शरद लाड यांच्या सहकार्याने जास्तीत जास्त मदत या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी श्री १००८ कलिकुंड नवग्रह पार्श्वनाथ जैन मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष सचिन लडगे, सदस्य प्रवीण कत्ते, अतुल कत्ते, सरंपच प्रमिला पुजारी, उपसरपंच माणिक पवार, ग्रामपंचायत सदस्य किरण लाड, महारूद्र जंगम उपस्थित होते.

फोटो-१७कुंडल१

Web Title: Giri will develop Parshwanath mountain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.