समाधान सामाजिक संस्थेकडून शासकीय रुग्णालयास कागदी पाकिटांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:28 IST2021-02-24T04:28:30+5:302021-02-24T04:28:30+5:30
ओळी : सांगलीतील अभयनगर येथील समाधान एकता सामाजिक संस्थेतर्फे महिलांनी तयार केलेल्या कागदी पाकिटांची भेट शासकीय रुग्णालयास देण्यात आली. ...

समाधान सामाजिक संस्थेकडून शासकीय रुग्णालयास कागदी पाकिटांची भेट
ओळी :
सांगलीतील अभयनगर येथील समाधान एकता सामाजिक संस्थेतर्फे महिलांनी तयार केलेल्या कागदी पाकिटांची भेट शासकीय रुग्णालयास देण्यात आली. यावेळी डॉ. प्रदीप दीक्षित, नंदकिशोर गायकवाड, सुकेशनी दुपटे, मनोज दाभाडे, रमाकांत राठोड, मनोज पवार, सतीश अष्टेकर, सीमा चव्हाण उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
संजयनगर : सांगलीतील अभयनगर येथील समाधान एकता सामाजिक संस्थेतर्फे महिलांनी तयार केलेली दहा हजार कागदी पाकिटे वसंतदादा शासकीय रुग्णालयास भेट देण्यात आली. सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम राबविण्यात आला.
प्लास्टिक मुक्तीसाठी महिलांनी तयार केलेल्या कागदी पाकिटांची भेट प्रभारी अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित यांच्याकडे सैपन सामंत व राहुल शेळके यांनी दिली.
यावेळी वैद्यकीय अधीक्षक नंदकिशोर गायकवाड, प्रशासकीय अधिकारी मनोज दाभाडे, सीमा चव्हाण, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश अष्टेकर, सहायक वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज पवार, वैद्यकीय अधिकारी रमाकांत राठोड, दादासाहेब दडास, सुकेशनी दुपटे आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. प्रदीप दीक्षित म्हणाले, प्लास्टिक मुक्तीसाठी कागदी पिशव्यांचा पर्याय उत्तम आहे. यामुळे प्रदूषण थांबून पर्यावरणाचे रक्षण होईल. पर्यावरण राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.