जतसाठी इंग्लंडमधून बायपॅप व्हेंटिलेटर उपकरणे भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:18 IST2021-07-04T04:18:59+5:302021-07-04T04:18:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जत : युथ फॉर जत या सामाजिक संस्थेकडून जत ग्रामीण रुग्णालय, जत व जीवनरेखा रक्त पतपेढी ...

जतसाठी इंग्लंडमधून बायपॅप व्हेंटिलेटर उपकरणे भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
जत : युथ फॉर जत या सामाजिक संस्थेकडून जत ग्रामीण रुग्णालय, जत व जीवनरेखा रक्त पतपेढी यांना बायपॅप व्हेंटिलेटर उपकरणे भेट देण्यात आली. इंग्लंडमधील भारतीय बांधवांनी आपल्या मातृभूमीसाठी ही मदत पाठवली आहे.
बायपॅप व्हेंटिलेटर हे अत्याधुनिक उपकरण असून, श्वासोच्छवास घेण्यास त्रास होणाऱ्या रुग्णांना अतिशय उपयुक्त ठरते. या उपकरणाचे वितरण आमदार विक्रम सावंत यांच्या हस्ते व प्रांताधिकारी प्रशांत आवटी, तहसीलदार सचिन पाटील यांच्या उपस्थितीत झाले. ग्रामीण रुग्णालयचे अधीक्षक डॉ. संजय बंडगर यांनी त्याचा स्वीकार केला.
दुसरा संच जीवनरेखा रक्त पतपेढी यांना एका कार्यक्रममध्ये देण्यात आला. यावेळी डॉ. कैलास सनमडीकर, डॉ. मनोहर मोदी, डॉ. सी. बी. पवार, डॉ. विजय पाटील व युथ फॉर जतचे अध्यक्ष दिनेश शिंदे उपस्थित होते.
सचिव अमित बामणे यांनी प्रास्ताविक केले. सचिन जाधव यांनी उपकरण देण्यामागची संस्थेची भूमिका मांडली. यावेळी डॉ. विजय पाटील, डॉ. हरिश माने, युथ फॉर जतचे सदस्य प्रदीप साळुंखे व प्रमोद साळुंखे उपस्थित होते.
030721\img_20210703_163415.jpg
इंग्लंड मधून जतसाठी बायपॅप व्हेंटीलेटर उपकरणे भेट