इस्लामपुरात जायंट्स सहेलीची विद्यार्थ्यांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:56 IST2021-09-02T04:56:10+5:302021-09-02T04:56:10+5:30
फोटो : इस्लामपूर येथील मराठी शाळा क्र. १ मधील विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यात आली. यावेळी सुनीता सकपाळ, संगीता शहा, कविता ...

इस्लामपुरात जायंट्स सहेलीची विद्यार्थ्यांना मदत
फोटो : इस्लामपूर येथील मराठी शाळा क्र. १ मधील विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यात आली. यावेळी सुनीता सकपाळ, संगीता शहा, कविता शहा उपस्थित होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : येथील उरुण परिसरातील जिल्हा परिषद शाळा नंबर एकमधील विद्यार्थ्यांसाठी जायंट्स इस्लामपूर सहेलीच्या वतीने शैक्षणिक उपक्रम राबविला. यात मराठी भाषेतील व आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नव्या डिजिटल युगातील माहिती देणारी ५० पुस्तके विद्यार्थ्यांना मोफत देण्यात आली.
या पुस्तकांचा वापर करून विद्यार्थ्यांना नव्या युगातील तंत्रज्ञानाचा अभ्यास घरी राहूनही सहजसोपा होणार असल्याचे सॉफ्टेकच्या संचालिका संगीता शहा यांनी यावेळी सांगितले. तसेच शाळा स्वच्छ व सुंदर राहावी या हेतूने शाळेतील कचरा व्यवस्थापनासाठी लागणारे दोन ड्रम जायंट्स इस्लामपूर सहेलीच्या अध्यक्ष सुनीता सपकाळ यांच्या सौजन्याने शाळेस देण्यात आले. यावेळी माजी अध्यक्षा कविता शहा व सदस्य उपस्थित होत्या.