जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूर सामाजिक कार्यात अग्रेसर : नारायण देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:18 IST2021-07-04T04:18:30+5:302021-07-04T04:18:30+5:30

जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूरमार्फत सीसीटीव्ही संचासाठी दुष्यंत राजमाने, रणजित जाधव, अ‍ॅड. श्रीकांत पाटील, राजकुमार ओसवास, नितीन शहा यांनी नारायण ...

Giants Group of Islampur Social Work Leader: Narayan Deshmukh | जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूर सामाजिक कार्यात अग्रेसर : नारायण देशमुख

जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूर सामाजिक कार्यात अग्रेसर : नारायण देशमुख

जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूरमार्फत सीसीटीव्ही संचासाठी दुष्यंत राजमाने, रणजित जाधव, अ‍ॅड. श्रीकांत पाटील, राजकुमार ओसवास, नितीन शहा यांनी नारायण देशमुख यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूर परिसरात होत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमात नेहमीच अग्रेसर राहिला आहे, असे गौरवोद्गार इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी काढले.

जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूरमार्फत इस्लामपूर पोलीस दलास २६,००० रुपये किमतीचा सीसीटीव्ही संच भेट देण्यात आला. या कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते. संपूर्ण इस्लामपूर शहर सीसीटीव्ही युक्त होत असून, जायंट्सने दिलेल्या दोन सीसीटीव्हीच्या संचामुळे आमच्या या उपक्रमास मोलाची मदत झालेली आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमात जायंट्स ओपन जिमच्या उभारणीस हातभार लावलेल्या देणगीदारांचा देशमुख यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

जायंट्सचे अध्यक्ष दुष्यंत राजमाने यांनी प्रशासनास अशाच प्रकारे सहकार्य करून जायंट्स ग्रुपची उज्ज्वल परंपरा कायम ठेवू असा विश्वास उपस्थितांना दिला. यावेळेस कार्यवाह रणजीत जाधव, खजिनदार अ‍ॅड. श्रीकांत पाटील, युनिट डायरेक्ट राजकुमार ओसवाल व नितीन शहा, फेडरेशन उपाध्यक्ष प्रशांत माळी, माजी स्पेशल कमिटी मेंबर डॉ. नितीन पाटील व सदस्य उपस्थित होते. कार्यवाह रणजीत जाधव यांनी सूत्रसंचालन केले, तर अ‍ॅड. श्रीकांत पाटील यांनी आभार मानले.

Web Title: Giants Group of Islampur Social Work Leader: Narayan Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.