जायंट्स ग्रुप ऑफ सहेलीची तळीयेत मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:30 IST2021-08-13T04:30:45+5:302021-08-13T04:30:45+5:30
सांगली : तळीये (जि. राजगड) गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर हरिपूर (सांगली) येथील जायंटस ग्रुप ऑफ सहेलीच्या माध्यमातून महिलांनी ...

जायंट्स ग्रुप ऑफ सहेलीची तळीयेत मदत
सांगली : तळीये (जि. राजगड) गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर हरिपूर (सांगली) येथील जायंटस ग्रुप ऑफ सहेलीच्या माध्यमातून महिलांनी ग्रामस्थांना जीवनावश्यक साहित्य दिले. स्वत: पूरग्रस्त असतानाही या महिलांनी तेथे जाऊन मदतीचा हात दिला. तळीये दुर्घटनेत कोंडाळकर वाडीवर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. त्यामुळे तेथे मदतीचा ओघ आजही सुरूच आहे. येथील जायंट्स ग्रुप ऑफ प्रेरणा सहेली व जायंट्स ग्रुप ऑफ आकांक्षा सहेलच्या माध्यमातून मदत वाटप करण्यात आली. तळीये ग्रामस्थांशी संवाद साधत या महिला त्यांच्या दुःखात सहभागी झाल्या. दरडग्रस्त कुटुंबांना अन्नधान्य, कपडे आदी साहित्यांचे वाटप केले. सुनीता शेरीकर यांनी नियोजन केले. अध्यक्षा उषा जाधव, सचिव पूजा जाधव, वैशाली माने, पूनम गुरव उपस्थित होत्या.
यासाठी शैलजाभाभी पाटील, हरिपूरमधील शाळा आणि अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस, पल्लवी भोकरे, परीमिता लोखंडे, अश्विनी सुमंत, अनमोल जुमराणी, शोभा चव्हाण, रेखा बोंद्रे, अमृता खोत, बीना पाटील, उज्ज्वला जैन, अपर्णा काळे, रागिणी फुलारी, भाग्यश्री जोशी, स्नेहल कुलकर्णी, सुजाता पाटील आदींचे सहकार्य लाभले.