मिरजेत तूप भेसळ करणारा कारखाना उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:23 IST2021-02-05T07:23:41+5:302021-02-05T07:23:41+5:30
तूप भेसळीच्या उद्योगाची माहिती मिळाल्यानंतर मिरज शहर पोलिसांनी सोमवारी सकाळी छापा टाकून भेसळयुक्त तूप व लोणी अन्न सुरक्षा विभागाच्या ...

मिरजेत तूप भेसळ करणारा कारखाना उघडकीस
तूप भेसळीच्या उद्योगाची माहिती मिळाल्यानंतर मिरज शहर पोलिसांनी सोमवारी सकाळी छापा टाकून भेसळयुक्त तूप व लोणी अन्न सुरक्षा विभागाच्या ताब्यात दिले. भेसळयुक्त तूप व लोणी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत, सुशील म्हस्के व माणिक शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली. हरबा तालीमजवळील वाड्यात एका खोलीत छापा टाकून एम. नागलिंगा दुर्गाप्पा मुथ्थलकर (वय ३५) व पी. चंद्रशेखर गुडलाप्पा पल्लेदौर (३८, दोघेही रा. दुर्गाम्मा गुडी बेनकल, ता. हळ्ळी जि. विजापूर) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. दोघांच्या कसून चौकशीनंतर त्यांनी कर्नाटकातून तूप आणून त्यात डालडा व खाद्यतेलाची भेसळ करीत असल्याची कबुली दिली.
पाेलिसांनी घटनास्थळी २६९ किलो भेसळयुक्त तूप व ४ किलो लोणी ताब्यात घेतले. भेसळयुक्त खाद्यपदार्थ तपासासाठी अन्न सुरक्षा विभागाकडे सोपविण्यात आले. त्यांचा प्रयोगशाळा तपासणी अहवाल आल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
चाैकट
बेकरी व्यावसायिकांमध्ये खळबळ
दोघांनी मिरजेत मिठाई निर्मिती व हाॅटेलचालकांना भेसळयुक्त तुपाचा पुरवठा करीत असल्याची माहिती दिली. मिरजेत कर्नाटकातून लोणी व तूप, आदी दुग्धजन्य पदार्थाची मोठी आवक होते. दुग्धजन्य पदार्थात भेसळीचा प्रकार उघडकीस आल्याने बेकरी व हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली होती.
फाेटाे : ०१ मिरज २..३