घाटनांद्रेतील पुलाचे काम निकृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:20 IST2021-05-03T04:20:29+5:302021-05-03T04:20:29+5:30
घाटनांद्रे : घाटनांद्रे (ता. कवठेमहंकाळ) गावालगत परशी ओढ्यावरील पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. पुलाचे ...

घाटनांद्रेतील पुलाचे काम निकृष्ट
घाटनांद्रे : घाटनांद्रे (ता. कवठेमहंकाळ) गावालगत परशी ओढ्यावरील पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. पुलाचे तर कामच नाही, केवळ संरक्षण कठडा उभारला जात असल्याचे सध्याचे चित्र आहे.
गेल्या दोन-तीन वर्षांपासून दिघंची-हेरवाड राज्यमार्गाचे काम अगदीच धिम्या गती सुरू होते. घाटमाथ्यावर या रस्त्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. तेव्हा ठेकेदाराने हे काम घाईगडबडीने उरकण्यावर भर दिला आहे. घाटनांद्रे परिसरात तर एका ते दोन तासांत रस्त्यावर केवळ डांबर हातरण्यात आले आहे, तर सध्या गावालगत असणाऱ्या मुख्य व मोठ्या ओढ्यावरील पुलाच्या बांधकामाचे काम सुरू आहे.
या ओढ्यावरील पुलाचे बांधकाम तर पूर्वी होते, त्या रस्त्यावर केवळ डांबर हातरण्यात आले आहे. या पुलाची ना उंची वाढवली ना रुंदी, ना रस्त्यावर खुदाई ना भराव, हा ओढा रिसरातील मुख्य व मोठा ओढा आहे. ऐन पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहते. त्यावेळी वाहतूकही काही काळ विस्कळीत होते. भविष्यात टेंभू योजनेचे पाणीही याच ओढ्यातून वाहात पुढे जाणार आहे. त्यामुळे या पुलाची उंची व रुंदी वाढवणे व भराव टाकून रस्त्याचे काम करणे गरजेचे आहे.
फोटो ओळी : घाटनांद्रे (ता. कवठेमहंकाळ)येथे फरशी ओढ्यावरील पुलाचे काम आहे त्या स्थितीतच केवळ संरक्षण कठडा उभारला जात आहे.
कोट
परिसरातील हा मोठा व मुख्य ओढा आहे. पावसाळ्यात हा ओढा दुथडी भरून वाहत असतो. काही वेळा पुलावरून पाणी वाहते. तेव्हा वाहतूकही विस्कळीत होते. तेव्हा या पुलाची उंची व रुंदी वाढवणे गरजेचे असताना, केवळ आहे त्या स्थितीत संरक्षण कठडा उभारला जात आहे. यावर विचार होणे गरजेचे आहे.
- अनिल शिंदे. ग्रामस्थ घाटनांद्रे