शंभर टक्के लसीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:26 IST2021-04-25T04:26:24+5:302021-04-25T04:26:24+5:30
कुंडल (ता. पलूस) येथे कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार अरुण लाड, महेंद्र ...

शंभर टक्के लसीकरण करा
कुंडल (ता. पलूस) येथे कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार अरुण लाड, महेंद्र लाड, बाळासाहेब पवार उपस्थित होते.
पलूस :
कोरोना प्रतिबंधक लस प्राण वाचविण्याचे साधन असल्याने लसीकरण शंभर टक्के करण्यावर भर द्या, असे आवाहन कृषी आणि सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी शनिवारी केले.
कुंडल (ता. पलूस) येथे ग्रामपंचायतीने कोरोनासंदर्भात केलेल्या उपाययोजना, लसीकरण याचा आढावा घेण्यासाठी आरोग्य विभाग, महसूल, ग्रामपंचायत, स्थानिक नेते, पदाधिकारी यांच्यासमवेत त्यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार अरुण लाड, जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, सत्यविजय बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार प्रमुख उपस्थित होते.
कदम म्हणाले की, लस घेणे हे प्राण वाचविण्याचे साधन असल्याने लस घेणाऱ्यांना रुग्णालयाची पायरी चढावी लागणार नाही. मागील वर्षाप्रमाणेच दक्षतेने काम करा. कोविड रुग्णांच्या घरावरील फलक काढल्यास, रुग्ण घराबाहेर पडत असेल तर तात्काळ व कडक कारवाई करा.
डॉ. किरण भोरे यांनी लसीकरणाचा आढावा घेतला. तहसीलदार निवास ढाणे, जिल्हा बँकेचे संचालक किरण लाड, गटविकास अधिकारी डॉ. स्मिता पाटील, सरपंच प्रमिला पुजारी, उपसरपंच माणिक पवार, उपसभापती अरुण पवार, सर्जेराव पवार, सहायक पोलीस निरीक्षक संगीता माने यांची उपस्थिती होती.