शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
2
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
3
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
4
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
5
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
6
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
7
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
8
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
9
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
10
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
11
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
12
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
13
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
14
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
15
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
16
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
17
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
18
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
19
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
20
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीची रत्ने : अविनाश सप्रे, अन् ‘समीक्षक’ म्हणून महाराष्ट्रभर ओळख प्राप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 16:07 IST

नाशिकला कुसुमाग्रज गौरव व्याख्यानमालेत 'स्वातंत्र्योत्तर मराठी कादंबरी' या' विषयावर दोन व्याख्याने दिली. ( स्वत: कुसुमाग्रज त्यावेळी श्रोत्यात हजर होते.) ...

नाशिकला कुसुमाग्रज गौरव व्याख्यानमालेत 'स्वातंत्र्योत्तर मराठी कादंबरी' या' विषयावर दोन व्याख्याने दिली. ( स्वत: कुसुमाग्रज त्यावेळी श्रोत्यात हजर होते.) ही व्याख्याने लेखस्वरूपात लिहिली आणि ‘प्रदक्षिणा : खंड दोन’मधून प्रकाशित झाली. या जवळजवळ नव्वदपानी दीर्घलेखातून मी स्वातंत्र्योत्तर काळातील कादंबऱ्यामधल्या प्रवृत्ती, प्रेरणा आणि प्रवाहांचा चिकित्सक वेध घेतला होता. या लेखामुळे ‘समीक्षक’ म्हणून माझी महाराष्ट्रभर ओळख प्राप्त झाली. सांगलीच्या इथल्या वास्तव्यातच हा सर्व लेखन प्रपंच करू शकलो, याचा मला सार्थ अभिमान वाटतो.

मी तसा मूळचा कोल्हापूरचा. राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे या निसर्गसंपन्न आणि संस्कृती समृद्ध गावात लहानाचा मोठा झालो. पुढे कोल्हापूरला इंग्रजी हा विषय घेऊन राजाराम कॉलेजमधून बी.ए. आणि शिवाजी विद्यापीठातून एम.ए. केले. १९७४ साली सांगलीला विलिंग्डन कॉलेजमध्ये रूजू झालो आणि २००७ साली इथल्याच चिंतामणराव कॉलेजमधून निवृत्त झालो. विलिंग्डनमध्ये प्रा. म. द. हातकणंगलेकर सर प्राचार्य होते. त्यांच्याबद्दल सर्वांनाच आदरयुक्त दरारा वाटत असे. त्यांच्या हाताखाली काम करण्याचे भाग्य मला लाभले. त्यांची समीक्षा मी काळजीपूर्वक वाचत होतो, समीक्षा कशी करावी, याचा वस्तुपाठच मला त्यातून मिळत होता. त्यातून ‘अभ्यासोनी प्रकटावे' ही वृत्तीच बनली. विलिंग्डनच्या ग्रंथालयात सातत्याने येत असलेली नवनवीन पुस्तके आणि मासिके, ग्रंथपाल रास्ते आवर्जून वाचायला देत असत. त्यातून मग आपणही लिहायला हवे असे वाटू लागले. सरांनी विलिंग्डनमध्ये ‘मराठी भाषा : शैली आणि तंत्र’ या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. अनेक नामवंत अभ्यासक, समीक्षक त्यात सहभागी झाले होते. त्या संबंधीचा मी लेख लिहिला, तो ‘सत्यकथा’मध्ये प्रकाशित झाला. भालचंद्र नेमाडेंच्या ‘कोसला’ कादंबरीने भारावून गेलो होतो. या कादंबरीवर लेख लिहिला. (‘कोसला’बद्दल या पुस्तकात तो समाविष्ट केला आहे.) इचलकरंजीला झालेल्या नाट्यसंमेलनाच्या वेळी नव्या प्रकारच्या असंगत नाट्यलेखनामुळे लक्षवेधी ठरलेल्या नवनाटककार सतीश आळेकर यांच्या नाट्यलेखनावर लिहिलेला दीर्घलेख संमेलनाच्या संग्राह्य स्मरणिकेत प्रसिद्ध झाला.

महाराष्ट्र व इतर राज्यांतील विद्यापीठांनी भाषा, साहित्य, संस्कृतीसंबंधी आयोजित केलेल्या चर्चासत्रासाठी, परिसंवादासाठी, व्याख्यानासाठी आमंत्रित केले. डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे या संस्थेचा आजीव सदस्य म्हणून कार्यरत राहिलो. महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) पुरस्कार, जनस्थान, कुसुमाग्रज पुरस्कार (नाशिक), शासन पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार (दिल्ली), प्रतिष्ठित पुरस्कारांच्या निवड समितीवर काम केले. सांगलीतल्या 'चतुरंग-अन्वय'या दिवाळी अंकाचा कार्यकारी संपादक म्हणूनही सध्या कार्यरत आहे.

बंगळुरूला अनंतमूर्तींची मुलाखत..महाराष्ट्र राज्याच्या ‘महाराजा सयाजीराव गायकवाड समग्र लेखन' या प्रकल्पाच्या पहिल्या पंचवीस खंडांपैकी महाराजांच्या इंग्रजी भाषणांचा समावेश असलेल्या खंड सहा आणि सातचे संपादन आणि प्रस्तावना लिहिण्याची संधी मिळाली. 'लोकमत'च्या वतीनं प्रसिद्ध होणाऱ्या 'दीपोत्सव' या दिवाळी अंकासाठी प्रत्यक्ष बंगळुरुला जाऊन विख्यात कानडी लेखक आणि साहित्य अकादमीचे तेव्हा अध्यक्ष असलेल्या यु. आर. अनंतमूर्ती यांची मुलाखत घेतली.

टॅग्स :Sangliसांगली