शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरच चूल मांडून थापल्या भाकऱ्या, गॅस दरवाढीचा सांगलीत राष्ट्रवादी महिला आघाडीकडून निषेध

By अविनाश कोळी | Updated: March 4, 2023 15:49 IST

अच्छे दिन’ची घोषणा करीत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने महागाई भडकविण्याचा सपाटा लावला

सांगली: गॅस सिलिंडर दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने आज, शनिवारी सांगलीत राष्ट्रवादी कार्यालयासमोर चूल पेटवून आंदोलन करण्यात आले. महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर चूल मांडून भाकऱ्या थापल्या. शासनाच्या धोरणाचा निषेधही करण्यात आला.सांगलीच्या वसंत कॉलनीतील राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.आघाडीच्या अध्यक्ष सुष्मिता जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी जाधव म्हणाल्या की, गॅस सिलिंडरच्या दरवाढीचा भडका सामान्यांना न परवडणारा आहे. भाजप सरकार सत्तेत आल्यापासून गॅस दरवाढ सातत्याने होत आहे. हजार रुपयांचा टप्पा ओलांडून गॅस दर पुढे गेला आहे. अनुदानही बंद केले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना पुन्हा चूल मांडून स्वयंपाक करण्यास सरकार भाग पाडत आहे. सरकारने ही दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन उभारू, असा इशारा त्यांनी दिला.महिला आघाडीच्या नेत्या ज्योती अदाटे म्हणाल्या की, अच्छे दिन’ ची घोषणा करीत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने महागाई भडकविण्याचा सपाटा लावला आहे. गरिबांचे निम्मे बजेट सिलिंडरवर खर्च होणार असेल तर त्यांनी जगायचे कसे?आंदोलनात वंदना चंदनशिवे, सुरेखा सातपुते, प्रियांका तुपलोंढे, छाया जाधव, संध्या आवळे, सुरेखा हेगडे, सुनीता जगदाळे, संगीता जाधव आदी महिला सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :SangliसांगलीInflationमहागाईNCPराष्ट्रवादी काँग्रेसagitationआंदोलन