बिळूरमध्ये गॅस वितरकाचे गोडावून फोडले, ३८ हजारांचा मुद्देमाल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:06 IST2020-12-05T05:06:42+5:302020-12-05T05:06:42+5:30
जत : बिळूर (ता. जत) येथील जयश्री एच.पी. गॅस ग्रामीण वितरक कंपनीचे गोडावून व कार्यालय फोडून अज्ञात चोरट्यांनी ३७ ...

बिळूरमध्ये गॅस वितरकाचे गोडावून फोडले, ३८ हजारांचा मुद्देमाल लंपास
जत : बिळूर (ता. जत) येथील जयश्री एच.पी. गॅस ग्रामीण वितरक कंपनीचे गोडावून व कार्यालय फोडून अज्ञात चोरट्यांनी ३७ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना सोमवार, दि. ३० नोव्हेंबर रोजी रात्री घडली. याप्रकरणी दि.१ डिसेंबर रोजी रात्री उशिरा महेश ऊर्फ मलगोंडा पिरगोंडा पाटील यांनी जत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बिळूर ते जत रस्त्यावर बिळूरपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर जयश्री एच. पी. गॅस कंपनीचे गोडावून व कार्यालय आहे. अज्ञात चोरट्यांनी सोमवारी रात्री कार्यालय व गोडावून फोडून सुरक्षापाईप, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर, एच. पी. कंपनीचे १४ किलो वजनाचे दोन सिलिंडर व रोख रक्कम चार हजार रुपये असा सुमारे ३७ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी रात्री उशिरा जत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सचिन हाक्के करत आहेत.