शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांना सिलिंडर २०० रुपयांनी स्वस्त; वितरकांना कोटींचा खड्डा, भरपाई देण्याची केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 12:36 IST

कंपन्यांनी भरपाई देण्याची वितरक महासंघाची मागणी

सांगली : केंद्र सरकारने गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्याचा मोठा फटका वितरकांना बसला आहे. देशभरातील २६ हजार वितरकांना सुमारे ३०० कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे. गॅस कंपन्यांनी याची भरपाई देण्याची मागणी एलपीजी वितरक महासंघाने केंद्र सरकारकडे केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रक्षाबंधनादिवशी गृहिणींना दिलासा देणारी घोषणा केली, त्यानुसार १४.२ किलोग्राम वजनाच्या घरगुती वापराच्या गॅसच्या सिलिंडरच्या किमती २०० रुपयांनी कमी केल्या. यामुळे सिलिंडर फार स्वस्त झाला नसला, तरी २०० रुपयांचा दिलासा मात्र मिळाला. या निर्णयाची अंमलबजावणी ३० ऑगस्टपासून सुरू झाली.

मात्र, गॅस कंपन्यांनी २९ ऑगस्टपासूनच सिलिंडरचा मोठा साठा वितरकांकडे पाठवून दिला. वास्तविक वितरकांनी आगाऊ पैसे भरून मागणी नोंदविल्याशिवाय कंपन्यांकडून सिलिंडर भरून गाड्या पाठविल्या जात नाहीत. पण, पंतप्रधानांनी दर कमी करण्याची घोषणा करताच कंपन्यांनी भरभरून गाड्या पाठविल्या. त्याची बिले परस्पर वितरकांना धाडली.याशिवाय वितरकांकडे पूर्वीच आलेला साठाही शिल्लक होता. याचा एकूणच आर्थिक भार त्यांच्यावर पडला. प्रत्येक वितरकाचे सरासरी लाखभर रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे महासंघाने आता केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे.

जबाबदारी तेल कंपन्यांनी घ्यावीमहासंघाने केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, पंतप्रधानांनी महिलांना रक्षाबंधनाची दिलेली भेट स्वागतार्ह आहे; पण त्याचा असह्य बोजा वितरकांवर पडला आहे. प्रत्येक सिलिंडरमागे २०० रुपये दरकपात केल्याची जबाबदारी केंद्र सरकारने घेतली आहे, त्याच धर्तीवर वितरकांच्या नुकसानीची जबाबदारीही तेल उत्पादक कंपन्यांनी घ्यावी. भरपाईचे पैसे द्यावेत.

दरकपातीच्या निर्णयाने वितरकांना कोट्यवधींचा फटका बसला आहे. प्रत्येक वितरकाकडे अगोदरच साठा होता. दरकपातीची घोषणा अनपेक्षितरीत्या झाल्याने फरकाचे पैसे वितरकांनाच भरावे लागात आहेत. त्यामुळे कंपन्यांनी भरपाई देण्याची मागणी आहे. - पवन सोनी, सरचिटणीस, एलपीजी वितरक महासंघ

टॅग्स :Sangliसांगली