बागकाम देईल मानसिक, शारीरिक आरोग्याचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:29 IST2021-09-06T04:29:55+5:302021-09-06T04:29:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : निसर्गापासून आपण दूर जात असल्याने आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत बागकामातून ...

बागकाम देईल मानसिक, शारीरिक आरोग्याचा लाभ
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : निसर्गापासून आपण दूर जात असल्याने आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत बागकामातून शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळेल, असे मत मिरजेचे उपविभागीय कृषी अधिकारी प्रकाश सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.
कृषी विकास आणि संशोधन संस्थेच्यावतीने नर्सरी डेव्हलपमेंट व गार्डन मेंटेनन्स अभ्यासक्रमाच्या प्रशस्तीपत्रांचे वितरण व स्वागत सोहळा पार पडला. यावेळी प्रकाश सूर्यवंशी, संस्थेच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामकृष्ण पटवर्धन उपस्थित होते. प्रकाश सूर्यवंशी म्हणाले की, कृषीचे हे अभ्यासक्रम करण्यासाठी सर्व वयोगटातील लोक सहभागी असणे ही चांगली गोष्ट आहे. विद्यार्थ्यांनी स्वत:ची बाग स्वतः विकसित केली ही गोष्ट कौतुकास्पद आहे. सध्याच्या काळात बागकाम मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी उपयोगी आहे.
समन्वयक प्रा. संजीव वालावलकर यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रा. राजकुमार पाटील यांनी आढावा घेतला. किशोर चंदुरे यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल व प्रा. अनिल कोगनोळे यांच्या सेवानिवृत्तीनिमित सत्कार करण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थी डॉ. अशोक देशपांडे, पल्लवी पांडेकर, मलाणी व सायली कुलकर्णी यांनी या अभ्यासक्रमाचा अनुभव मांडला. यावेळी कृषी अधिकारी रमाकांत भजनावळे, प्रा. प्रदीप खांडेकर उपस्थित होते. वालावलकर यांनी आभार मानले.