बागणीत आरोग्य केंद्र चौक रस्ता बनला अपघात केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:28 IST2021-09-26T04:28:26+5:302021-09-26T04:28:26+5:30
ओळ : बागणी (ता. वाळवा) येथे टाेप ते दिघंची रस्त्याची दुरवस्था झाली आहे. लाेकमत न्यूज नेटवर्क बागणी : टोप ...

बागणीत आरोग्य केंद्र चौक रस्ता बनला अपघात केंद्र
ओळ : बागणी (ता. वाळवा) येथे टाेप ते दिघंची रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
बागणी : टोप ते दिघंची रस्त्याचे रखडलेले काम व सार्वजनिक बांधकाम विभागाची गांधारीची भूमिका यामुळे हा रस्ता अपघाताचे कारण ठरत आहे. बागणी येथील प्राथमिक आराेग्य केंद्राचा चाैक अपघाताचे केंद्र ठरत आहे.
रस्ता क्र. १५१ हा दिघंची, आटपाडी, आष्टा ते टोप असा ८८ किलोमीटरचा रस्ता आहे. प्रशासकीय मंजुरीनुसार ४५० कोटींचे हे काम आहे. या मुख्य रस्त्याचे काम हे महा अरविंद रोडवेज प्रा. लि. या ठेकेदार कंपनीला देण्यात आले आहे. दिघंची ते टोप असा कोल्हापूरला जोडणारा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यांचे बहुतांश काम पूर्ण झाले असले तरी जिथे गावात जाणारा जोड रस्ता आहे तिथे दोन्ही बाजूला २०० मीटर भराव करुन तो रस्ता मुख्य रस्त्याला जाेडणे अपेक्षित आहे. तरीही हा भराव केलेला नाही. काही ठिकाणी नाममात्र मुरुम व मोठे दगड टाकून दिले आहेत. यामुळे वाहनांचे नुकसान हाेत आहे. रात्रीच्या वेळी रस्त्याचा अंदाज न आल्याने वारंवार अपघात हाेत आहेत. या रस्त्याच्या दर्जाबाबत आंदोलने होऊन सुद्धा रस्त्याचा दर्जा सुधारण्यासाठी कोणतेही काम झालेले दिसत नाही. यामुळे नागरिकांमधून संतप्त पडसाद उमटत आहेत.
चौकट
ग्रामपंचायतीने मुरुम टाकावा
याबाबत रस्त्याचे कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जेव्हा जाग येईल तेव्हा येईल. पण ताेपर्यंत बागणी व काकाचीवाडी ग्रामपंचायतीने येथे तात्पुरता मुरुम टाकून वाहनधारकांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.
काेट
या रस्त्यावर ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे दोन जणांना जीव गमवावा लागला आहे. लवकरच रस्त्याचे कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार आहे. रस्त्याच्या दर्जाबाबत न्यायालयात दाद मागणार आहे.
- युवराज निकम
शिवसेना वाळवा तालुका माजी प्रमुख व उपजिल्हा संघटक
250921\img_20210925_155540.jpg
जोड रस्त्याची अवस्था