सांगली अप्पर तहसीलदार कार्यालय परिसरात कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:28 IST2021-02-09T04:28:55+5:302021-02-09T04:28:55+5:30
संजयनगर : सांगली शहरातील राजवाडा चौकातील अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या मुख्य इमारतीमधील शौचालयाची दुरवस्था झाली आहे. शहरात सर्वत्र स्वच्छता अभियान ...

सांगली अप्पर तहसीलदार कार्यालय परिसरात कचरा
संजयनगर : सांगली शहरातील राजवाडा चौकातील अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या मुख्य इमारतीमधील शौचालयाची दुरवस्था झाली आहे. शहरात सर्वत्र स्वच्छता अभियान राबवले जात असताना या कार्यालयात स्वच्छता होत नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
या ठिकाणी शौचालयामध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. महिलांसाठी असणाऱ्या शाैचालयाला कुलूप आहे. शौचालयामध्ये पाण्याची व्यवस्था नाही. शिवाय कार्यालयामागे प्रचंड प्रमाणात कचरा आहे.
अप्पर तहसीलदार कार्यालयातील शौचालयाची दुरुस्ती न केल्यास शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सांगली प्रमुख मयूर घोडके यांनी दिला आहे
चाैकट
दारूच्या रिकाम्या बाटल्या
अप्पर तहसीलदार कार्यालय सरकारी कार्यालय असूनही परिसरात रिकाम्या दारूच्या बाटल्या पडल्या आहेत. याबाबत येथे येणाऱ्या नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे. हे कार्यालय नव्याने सुरू झाले असले, तरी येथील परिसराच्या स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. यामुळे नागरिकांतून दुर्लक्ष होत आहे.
फोटो-०८दुपटे२फोटो सांगलीतील अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या मुख्य इमारतीमध्ये असलेल्या स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली असून, येथे महिलांसाठी असणाऱ्या शाैचालयाला कुलूप आहे. छाया : सुरेंद्र दुपटे