अभयनगर येथील आरोग्य केंद्रासमोर कचऱ्याचे ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:09 IST2021-01-13T05:09:46+5:302021-01-13T05:09:46+5:30

संजयनगर : सांगली शहरातील प्रभाग क्रमांक ९ येथील महापालिका आरोग्य केंद्राजवळील रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साठून राहिले आहेत. यामुळे नागरिकांचे ...

Garbage pile in front of the health center at Abhaynagar | अभयनगर येथील आरोग्य केंद्रासमोर कचऱ्याचे ढीग

अभयनगर येथील आरोग्य केंद्रासमोर कचऱ्याचे ढीग

संजयनगर : सांगली शहरातील प्रभाग क्रमांक ९ येथील महापालिका आरोग्य केंद्राजवळील रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साठून राहिले आहेत. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या ठिकाणच्या खासगी शाळेजवळ आणि आरोग्य केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात कचरा साठून राहिला आहे. कचरा उठाव करावा म्हणून नागरिकांनी लोकप्रतिनिधी आणि महापालिका आरोग्य विभागाकडे तक्रार केली आहे. परंतु कचरा उठाव होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. यामुळे या परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, दुर्गंधी पसरली आहे.

फोटो ओळी : अभयनगर येथील आरोग्य केंद्राबाहेर रस्त्याच्याकडेला मोठ्या प्रमाणात कचरा साठून राहिला आहे

छाया : सुरेंद्र दुपटे

Web Title: Garbage pile in front of the health center at Abhaynagar