बागणी येथील कचरा डेपोला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:25 IST2021-04-11T04:25:15+5:302021-04-11T04:25:15+5:30

बागणी : बागणी (ता. वाळवा) येथील कचरा डेपोला शुक्रवार दि. ९ रोजी दुपारी भीषण आग लागली. अचानक लागलेल्या या ...

Garbage depot fire at Bagni | बागणी येथील कचरा डेपोला आग

बागणी येथील कचरा डेपोला आग

बागणी

: बागणी (ता. वाळवा) येथील कचरा डेपोला शुक्रवार दि. ९ रोजी दुपारी भीषण आग लागली. अचानक लागलेल्या या आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केल्याने येथील नागरिकांमध्ये भीती पसरली होती. आष्टा अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली.

बागणी येथे गावातील कचरा ट्रॅक्टरने दररोज गोळा केला जातो व तो कचरा गावालगत असलेल्या हनुमान मंदिराच्या बाजूला असलेल्या किल्ल्याच्या खंदकात व किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या खंदकानजीक टाकला जातो. शुक्रवारी दुपारी या कचरा डेपोला अचानक आग लागल्याने या परिसरातील नागरिकांना धुराचा त्रास सहन करावा लागला. काही वेळातच आगीचे लोळ आणि धुरामुळे या परिसरातील तापमानात वाढ झाली. आगीची माहिती मिळताच ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली ही आग नेमक्या कोणत्या कारणाने लागली, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

चाैकट

स्वतंत्र जागेची मागणी

या आगीमुळे येथील कचऱ्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून ग्रामपंचायतीने कचरा डेपोसाठी गावापासून लांब स्वतंत्र जागा घेऊन स्वतंत्र कचरा डेपो करावा, ही मागणी जोर धरू लागली आहे.

Web Title: Garbage depot fire at Bagni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.