कचरा वेचकांचे वीज बिल माफ करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:49 IST2021-03-04T04:49:45+5:302021-03-04T04:49:45+5:30

संजयनगर : काेराेनाकाळात कचरा वेचकांचा व्यवसाय बुडाला आहे. त्यामुळे त्यांची उपासमार होत आहे. त्यांची परिस्थिती खूप हलाखीची झाली आहे. ...

Garbage collectors demand waiver of electricity bills | कचरा वेचकांचे वीज बिल माफ करण्याची मागणी

कचरा वेचकांचे वीज बिल माफ करण्याची मागणी

संजयनगर : काेराेनाकाळात कचरा वेचकांचा व्यवसाय बुडाला आहे. त्यामुळे त्यांची उपासमार होत आहे. त्यांची परिस्थिती खूप हलाखीची झाली आहे. त्यातच वाढीव वीज बिलासाठी ‘महावितरण’कडून तगादा सुरू आहे. लॉकडाऊनकाळातील वीज बिल माफ करावे, या मागणीचे निवेदन अवनि संस्थेच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चाैधरी यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, अवनि संस्थेने सांगली जिल्ह्यातील ५०४ कचरा वेचकांचे संघटन केले आहे. त्याच्या विकासाचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यांचे हक्क मिळवून देणे हा अवनि संस्थेचा प्रयत्न आहे. लाॅकडाऊनकाळातील कचरा वेचकांचे वीज बिल माफ करावे. यावेळी अवनि संस्थेच्या उपाध्यक्षा अनुराधा भोसले, जिल्हा समन्वयक जैन्नुद्दिन पन्हाळकर, सामाजिक कार्यकर्ता सोनाली कांबळे कचरावेचक संघटनेच्या स्मिता गायकवाड, रूपाली गोसावी, द्रुपदा कांबळे उपस्थित होते.

Web Title: Garbage collectors demand waiver of electricity bills