चव्हाणवाडी येथे गंजीला आग; लाखाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:25 IST2021-02-13T04:25:24+5:302021-02-13T04:25:24+5:30

कोकरुड : चव्हाणवाडी-येळापूर (ता. शिराळा) येथील तुकाराम रामचंद्र उंडाळकर यांच्या गवताच्या गंजीस आग लागून एक लाखाचे नुकसान झाले. ही ...

Ganji fire at Chavanwadi; Loss of lakhs | चव्हाणवाडी येथे गंजीला आग; लाखाचे नुकसान

चव्हाणवाडी येथे गंजीला आग; लाखाचे नुकसान

कोकरुड : चव्हाणवाडी-येळापूर (ता. शिराळा) येथील तुकाराम रामचंद्र उंडाळकर यांच्या गवताच्या गंजीस आग लागून एक लाखाचे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास घडली. तलाठी सातपुते यांनी घटनास्थळास भेट देऊन पंचनामा केला आहे.

तुकाराम उंडाळकर यांचे चव्हाणवाडी पश्चिमेस वस्तीवर घर असून, तेथे ते कुटुंबासह राहत असतात. घराच्या लागूनच जनावरांचे शेड असून, येथे जनावरांसाठी लागणारा गवत, पिंजर यांच्या गंजी होत्या. सोबत शेणकुटे आणि सागाची लाकडेही होती. रात्री दोन सुमारास तुकाराम उंडाळकर उठून बाहेर आले असता, घराला लागून असलेल्या गंजी पेटल्याचे लक्षात आले. त्यांनी आरडा ओरड करून लोकांना जागे कले. सर्वांनी घरातील पाणी आणि शेतातील पाणी उपसा करून आग विझवली. यात अंदाजे एक लाखाचे नुकसान झाले. तलाठी मारुती सातपुते यांनी पंचनामा केला.

Web Title: Ganji fire at Chavanwadi; Loss of lakhs