शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत पैशाच्या वादातून गुंड छोट्या बाबरवर कोयत्याने हल्ला, पाचजणांवर गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 14:04 IST

परस्परविरोधी फिर्याद दाखल

सांगली : उसने घेतलेले पैसे परतफेड करण्याच्या वादातून गुंड छोट्या ऊर्फ विक्रांत शंकर बाबर (वय ४९, रा. सुतार प्लॉट) याच्यावर कोयत्याने व चाकूने हल्ला केल्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी घडला.याबाबत बाबर याची भाची, निलंबित पोलिस कोमल रामचंद्र धुमाळ, वैशाली रामचंद्र धुमाळ, अमित रामचंद्र धुमाळ, ओंकार महेश लोहार, सौरभ दिलीप सादरे (रा. सुतार प्लॉट, सांगली) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे, तर एका महिलेस मारहाण करून विनयभंग केल्याप्रकरणी संशयित छोट्या बाबर आणि पत्नी रेखा यांच्याविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शनिवारी सायंकाळी छोट्या बाबर आणि पत्नी घरी असताना त्याची भाची कोमल धुमाळ, वैशाली धुमाळ, अमित धुमाळ, ओंकार लोहार व सौरभ सादरे घरासमोर आले. कोमलकडून उसने घेतलेले पैसे मागितले. बाबरने पैसे परत दिले असल्याचे सांगितले. त्यावरून वादावादी सुरू झाली.

तेव्हा कोमलने काठीने बाबरची पत्नी रेखा हिच्या डोळ्यावर मारले, तर अमित धुमाळ व ओंकार लोहारने कोयत्याने डोक्यावर मारले. सौरभ याने चाकूने हातावर मारून जखमी केले. वैशालीने बाबरच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतले, अशी फिर्याद बाबरने दिली आहे.दरम्यान, छोट्या बाबर आणि त्याच्या पत्नीविरुद्ध महिलेस मारहाण करून विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. एका इमारतीच्या जिन्यावर संशयित छोट्या बाबर चार मित्रांना घेऊन बोलत उभा होता. पीडित महिलेने त्यांना तुम्ही येथे थांबू नका, असे सुनावले. त्यामुळे छोट्या बाबरला राग आला.त्याने मित्र विनायक येडके याला पीडित महिलेच्या अंगावर ढकलून दिले. त्यानंतर काही वेळाने पुन्हा पीडित महिलेला अश्लील शिवीगाळ केली. तिने जाब विचारताच बाबर पती(पत्नीने तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तुझ्या भावाला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.