इस्लामपुरात गुंडांच्या टोळीचा हॉटेलमध्ये धिंगाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:17 IST2021-07-12T04:17:58+5:302021-07-12T04:17:58+5:30

इस्लामपूर : येथील प्रशासकीय इमारतीच्या बाजूला असणाऱ्या हॉटेलमध्ये जेवण देण्याची मागणी करत पोलीस रेकॉर्डवरील गुंडांच्या टोळीने शिवीगाळ, दमदाटी करत ...

A gang of thugs stormed a hotel in Islampur | इस्लामपुरात गुंडांच्या टोळीचा हॉटेलमध्ये धिंगाणा

इस्लामपुरात गुंडांच्या टोळीचा हॉटेलमध्ये धिंगाणा

इस्लामपूर : येथील प्रशासकीय इमारतीच्या बाजूला असणाऱ्या हॉटेलमध्ये जेवण देण्याची मागणी करत पोलीस रेकॉर्डवरील गुंडांच्या टोळीने शिवीगाळ, दमदाटी करत धिंगाणा घातला. हा प्रकार शनिवारी रात्री १०.१५च्या सुमारास घडला. या घटनेने हॉटेलमधील महिला कर्मचारी भयभीत झाल्या होत्या.

रणजित भीमराव शिंदे (वय ३१) या हॉटेल चालकाने याविषयी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यावरून वैभव विक्रम पाटील, गुरू जाधव आणि इतर दोन अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. शनिवारी रात्री हे चौघे हॉटेलमध्ये आले होते. तेथे त्यांनी जेवण देण्याची मागणी केली. त्यावर शिंदे यांनी कोविड रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना जेवण दिले जाते, असे सांगितल्यावर या टोळक्याने शिवीगाळ आणि दमदाटी करत धिंगाणा घातला. याठिकाणी शासनाच्या शिवभोजन थाळीचा उपक्रमही चालवला जातो. टोळक्याच्या गोंधळ घालण्यामुळे हॉटेलमधील महिला कर्मचारी भयभीत झाल्या होत्या. पोलीस नाईक शरद बावडेकर अधिक तपास करत आहेत.

Web Title: A gang of thugs stormed a hotel in Islampur