शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांच्या टोळीला आटपाडीत अटक

By admin | Updated: September 16, 2014 23:26 IST

सातजणांचा समावेश : १८ लाखांचा ऐवज जप्त

आटपाडी : सांगली आणि सातारा जिल्ह्यांत धुमाकूळ घालणाऱ्या चोरट्यांच्या चौदाजणांच्या टोळीचा आटपाडी पोलिसांनी पर्दाफाश केला असून, त्यांच्यापैकी सातजणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ६१० ग्रॅम सोने व दहा किलो चांदी असा सुमारे १८ लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. टोळीवर ‘मोक्का’ कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती उपअधीक्षक डॉ. अभिजित पाटील यांनी दिली.अटक केलेल्यांत म्होरक्या विनायक काकड्या काळे (रा. तडवळे, ता. खटाव), धनाजी जकिऱ्या पवार (रा. बोंबाळे, ता. खटाव), अमोल जयसिंग शिंदे व सागर जयसिंग शिंदे (दोघे रा. इडा, ता. भूम. जि. उस्मानाबाद), राजू गुलाब शेख, प्रवीणकुमार दत्ताजी काळे (दोघे रा. तडवळे, ता. खटाव) व संदेश मधुकर कदम (रा. पळशी, जि. सांगली) यांचा समावेश आहे. काकड्या काळे, रवींद्र काकड्या काळे, सचिन माळी, नागेश मोहन काळे, नागराज मोहन काळे, सिद्धेश्वर लक्ष्मण काळे, लखन पवार (सर्वजण रा. तडवळे, ता. खटाव) यांचा पोलीस शोध घेत आहेत. त्यांच्याकडून चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या मुंबईतील भार्इंदर येथील ‘गुरुकृपा टंच’ दुकानाचा मालक सयाजी शिवाजी काळे (मूळ गाव हिंगणे, ता. खटाव) याच्यासह चोरट्यांच्या टोळीला सराफी दुकान व श्रीमंतांच्या घरांची माहिती देणाऱ्या विजय भगवान पवार (रा. गारुडी, ता. खटाव) या मंडप व्यावसायिकालाही अटक केली आहे.चार मे रोजी पळशी (ता. खानापूर) येथून टोळीने ४६ हजारांचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणात विनायक काळे या संशयिताला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला. ५ आॅक्टोबर २०१३ ला या टोळीने जांभुळणी (ता. आटपाडी) येथील महादेव राजाराम जुगदर यांच्या घरात घुसून दोन लाख १७ हजारांचा सोन्या-चांदीचा ऐवज चोरून नेल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर विटा येथे ९ एप्रिलला आशिष अविनाश घाडगे यांच्या घराचे कुलूप तोडून ४० हजार रुपयांची चोरी केल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय २० नोव्हेंबर २०१२ रोजी रामचंद्र यशवंत जुगदर (मूळ गाव जांभूळणी) यांचे कलेढोण येथील अमित ज्वेलर्स हे दुकान फोडून २१ लाख ६० हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरल्याची कबुली या टोळीने दिली आहे. यामधील ६०० ग्रॅम सोने आणि १० किलो चांदी पोलिसांनी जप्त केली आहे. (वार्ताहर)आणखी चोऱ्या उघडकीस येणारवडूज येथील एका सराफ व्यावसायिकाच्या दुकानात शिरून चोरट्यांनी सोन्या-चांदीचा ऐवज ठेवलेली तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रयत्न करूनही ती न फुटल्याने चोरट्यांनी ती चक्क टेम्पोत घालून घरी नेली. ही तिजोरी चोरटे चार दिवस फोडत होते. या टोळीतील उर्वरित सातजणांना अटक केल्यावर आणखी चोऱ्या उघडकीस येतील, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक डॉ. पाटील यांनी दिली.