शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

गुंड दडगे टोळीचा घरात घुसून हल्ला, सांगलीतील घटना : कुटुंबास मारहाण; जिवे मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 12:55 IST

सांगली येथील गुंड बंड्या ऊर्फ बंडोपंत दडगे व त्याच्या साथीदारांनी गावभागातील सुरेखा सुधाकर पाटील (वय ५२) यांच्या घरात घुसून हल्ला केला. कुटुंबातील सर्वांना बेदम मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. याप्रकरणी बंड्या दडगे, बाळू व्हनगुत्ते व तीन अनोळखींविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ठळक मुद्देघरात घुसून हल्ला केला, कुटुंबातील सर्वांना मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी बंड्या दडगे, बाळू व्हनगुत्ते व तीन अनोळखींविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा बंड्या दडगे पुन्हा चर्चेत

सांगली : येथील गुंड बंड्या ऊर्फ बंडोपंत दडगे व त्याच्या साथीदारांनी गावभागातील सुरेखा सुधाकर पाटील (वय ५२) यांच्या घरात घुसून हल्ला केला. कुटुंबातील सर्वांना बेदम मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. याप्रकरणी बंड्या दडगे, बाळू व्हनगुत्ते व तीन अनोळखींविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.सुरेखा पाटील गावभागातील पाटील गल्लीत नरसोबा बोळात राहतात. शनिवारी रात्री त्यांचे कुटुंब जेवण करुन झोपले होते. मध्यरात्री बंड्या दडगे व त्याच्या साथीदारांनी त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावला. त्यामुळे या कुटुंबाने दरवाजा उघडला. त्यावेळी बंड्यासह साथीदार घरात घुसले.त्यांनी सुरेखा पाटील, त्यांचा मुलगा व कुटुंबातील अन्य सदस्यांना शिवीगाळ करुन लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यांना जिवे मारण्याची धमकीही दिली. पाटील कुटुंबाने आरडाओरड केल्यानंतर शेजारचे लोक जागे झाले. त्यांनी पाटील यांच्या घराकडे धाव घेतल्यानंतर बंड्या व त्याच्या साथीदारांनी पलायन केले.त्यानंतर पाटील कुटुंबाने शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. सुरेखा पाटील यांची फिर्याद घेऊन पोलिसांनी बंड्या दडगेसह पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. अजून कोणाला अटक केलेली नाही.

बंड्या दडगे पुन्हा चर्चेतपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंड्या दगडे हा सुरेखा पाटील यांचा नातेवाईक आहे. किरकोळ कारणावरुन त्यांच्यात काही दिवसापूर्वी वादावादी झाली होता. या वादातून बंड्याने त्यांच्यावर घरात घुसून हल्ला केला. याप्रकरणी सध्या गुन्हा दाखल केला असला, तरी त्यांच्यात समेट घडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 

टॅग्स :SangliसांगलीCrimeगुन्हा