शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

परदेशात जहाजावर गणपती बाप्पाचा गजर, चीन प्रवासात उत्सवाचे आकर्षण; मराठमोळ्या युवकांचा उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 16:53 IST

सहदेव खोत पुनवत (जि. सांगली ) : ‘मर्चंट नेव्ही’च्या माध्यमातून परदेशात जहाजावर नोकरी करणाऱ्या मराठमोळ्या युवकांकडून सिंगापूर ते चीनदरम्यान ...

सहदेव खोतपुनवत (जि. सांगली) : ‘मर्चंट नेव्ही’च्या माध्यमातून परदेशात जहाजावर नोकरी करणाऱ्या मराठमोळ्या युवकांकडून सिंगापूर ते चीनदरम्यान प्रवासात असणाऱ्या हुगो एन. या जहाजावर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने भारतीय सांस्कृतिक परंपरेचे जतन परदेशात होत असल्याचे पाहावयास मिळत आहे.महाराष्ट्रातील अनेक ठिकाणचे युवक मर्चंट नेव्हीच्या माध्यमातून नोकरीच्या निमित्ताने परदेशात जात असतात. सध्या मुंबईच्या मरीन मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे हुगो एन. हे जहाज सिंगापूर ते चीनदरम्यान प्रवास करीत आहे. या जहाजावर कॅप्टन अजितकुमार खामकर (सातारा) यांच्या नेतृत्वाखाली पुनवत (ता. शिराळा) येथील जितेंद्र जाधव, सुनील कदम यांच्यासह संतोष काळे, संभाजी चांदणे, अनिकेत वाघ, श्रीकांत भोसले, वरुण प्रभुदेसाई, राहुल माने आदी मराठमोळे युवक कार्यरत आहेत.सध्या दक्षिण चीनच्या समुद्रातील जहाजावर मराठमोळ्या युवकांकडून मातीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. जहाजाच्या डेकवरून मिरवणूक काढत तसेच ‘गणपती बाप्पा मोरया’ अशा घोषणा देत मोठ्या आनंदात जहाजावर गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. जहाजावर उपलब्ध साहित्यातून गणपतीची सुंदर आरास केली आहे. प्रवासात दररोज गणपती पूजन, आरती व धार्मिक विधी केले जात आहेत.

महाराष्ट्रात गणपती उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो. आम्ही जरी परदेशात असलो, तरी सांस्कृतिक परंपरेचे जतन आम्हाला करता येत आहे. हा उत्सव सातासमुद्रापार साजरा करताना खूप आनंद होत आहे. पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव साजरा केला जात असून, ‘श्री’चे विसर्जन समुद्रात केले जाणार आहे. - अजितकुमार खामकर, कॅप्टन

टॅग्स :SangliसांगलीGanesh Mahotsavगणेशोत्सव