एकच गणपती स्थापन करणाऱ्या गावांना चिखलगी मठातर्फे गणेशमूर्ती भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:30 IST2021-09-12T04:30:46+5:302021-09-12T04:30:46+5:30
संख : जत तालुक्यात ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम राबविणाऱ्या गावांना चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी ...

एकच गणपती स्थापन करणाऱ्या गावांना चिखलगी मठातर्फे गणेशमूर्ती भेट
संख : जत तालुक्यात ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम राबविणाऱ्या गावांना चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी ‘श्रीं’ची मूर्ती, रोप, २०० मास्क, सॅनिटायझर देत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
श्रीसंत सयाजी बागडेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्य तालुक्यात २०१९ व २०१० पासून तालुक्यात ‘एक गाव एक गणपती’ राबविणाऱ्या गावांना मदतीचा हात देऊ केला आहे. यावर्षी भिवर्गी, बोर्गी, धुळकरवाडी, घोलेश्वर, तिप्पेहळळी, गोंधळेवाडी, आसंगी जत, गुडडापूर, गुलगुंजनाळ, उटगी तांडा, मेंढेगिरी, कुणिकोनूर, बागेवाडी, बागलवाडी, पांडोझरी, अंकलगी, कोसारी, सालेकिरी, गुळवंची, खंडनाळ, आसंगी वस्ती, गुडडापूर वस्ती, काराजनगी, संख येथील बोराळे वस्ती, जत येथील अंबिका नगर या ३८ गावांत मंडळांना वाटप केले.
तालुक्यात अनेक गावांनी ‘एक गाव एक गणपती’ बसवून या आवाहनास प्रतिसाद दिला आहे. त्या सर्व गावाना आपण स्वतः भेटून त्यांचे कौतुक करत त्यांना सन्मानपत्र, वृक्ष भेट, मास्क, सॅनिटायझर आदी भेट देणार असल्याचे तुकाराम बाबा महाराज यांनी सांगितले.
यावेळी श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे प्रशांत कांबळे, सूरज मणेर, विवेक टेंगले, बसवराज व्हनखंडे, फारुख शेख, रवी दोरकर, दत्ता सावळे, सिद्राया मोरे यांच्यासह गावातील पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो : ११ संख १
ओळ : जत तालुक्यात ‘एक गाव एक गणपती’ उपक्रमात सहभागी गावांना तुकाराम बाबा महाराज यांनी ‘श्रीं’ची मूर्ती भेट दिली.