इस्लामपूर क्रेडाईच्या अध्यक्षपदी गणेश पाटील यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:25 IST2021-03-08T04:25:46+5:302021-03-08T04:25:46+5:30
इस्लामपूर : येथील क्रेडाई इस्लामपूर शाखेच्या अध्यक्षपदी अभियंता गणेश पाटील यांची निवड झाली, तर कार्यवाह म्हणून महेश माळी, उमेश ...

इस्लामपूर क्रेडाईच्या अध्यक्षपदी गणेश पाटील यांची निवड
इस्लामपूर : येथील क्रेडाई इस्लामपूर शाखेच्या अध्यक्षपदी अभियंता गणेश पाटील यांची निवड झाली, तर कार्यवाह म्हणून महेश माळी, उमेश रायगांधी उपाध्यक्ष आणि भाविक पटेल यांची खजिनदारपदी एकमताने निवड करण्यात आली.
क्रेडाई इस्लामपूरच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मावळते अध्यक्ष अमोल पाटील, यशंवत गुणवंत यांनी पुढील दोन वर्षांसाठी या निवडी जाहीर केल्या. याचवेळी नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली.
त्यामध्ये किरीट पटेल (सहकार्यवाह), दत्तात्रय माने (सहखजिनदार), प्रवीण फल्ले (जनसंपर्क अधिकारी) यांच्यासह संचालक म्हणून अरविंद भालेकर, सतीश पाटील, राजेंद्र माळी, नागेश कुंभार, श्रीनिवास आठवले, अमोल यादव, विजय पाटील, नितीन फल्ले, अभिषेक फार्णे, अमोल गुणवंत, महादेव भालेकर, संजय दाभाेळे या अभियंत्यांचा समावेश आहे.
यशवंत गुणवंत यांनी शाखेचे नफा-तोटा पत्रक, ताळेबंद व लेखापरीक्षण अहवाल सादर केला. सभेने त्याला सर्वानुमते मंजुुरी दिली.