कसबे डिग्रजमध्ये कोरोनाबाबत ‘तंटामुक्ती’ची गांधीगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:26 IST2021-05-09T04:26:53+5:302021-05-09T04:26:53+5:30
कसबे डिग्रज : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे संचारबंदी असतानाही नागरिक रस्त्यावर फिरत आहेत. विनामास्क फिरणे, गर्दी करणे, तसेच ...

कसबे डिग्रजमध्ये कोरोनाबाबत ‘तंटामुक्ती’ची गांधीगिरी
कसबे डिग्रज : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे संचारबंदी असतानाही नागरिक रस्त्यावर फिरत आहेत. विनामास्क फिरणे, गर्दी करणे, तसेच सुरक्षित अंतर न ठेवण्याचा गंभीर प्रकार वाढत चालला आहे. याला आळा घालण्यासाठी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व राष्ट्रवादीचे नेते आनंदराव नलावडे यांनी गावामध्ये गांधीगिरी करत मोकाट फिरणाऱ्यांना हात जोडून विनंती केली सुरू केली आहे.
कसबे डिग्रजमध्ये कोरोना रुग्णांची पन्नाशी झाली आहे. गावामध्ये कडक बंदोबस्त ठेवूनही पोलीस गेले की, नागरिक बेफिकीर प्रवृत्तीने वागत असल्याचे दिसून येत आहे.
यामुळे आनंदराव नलावडे यांनी पहाटेपासून प्रबोधन करण्यास सुरुवात केली आहे. ‘मॉर्निंग वाॅक’वाले नागरिक, मोकाट फिरणारे यांना विनंती केली. वारंवार सांगूनही काही नागरिक ऐकत नसल्याचे पाहून नलावडे अक्षरशः हात जोडून विनंती करत आहेत. त्यांच्याबरोबर ग्रामपंचायत सदस्य संजय शिंदे, उपसरपंच सागर चव्हाण, संजय निकम, प्रमोद चव्हाण, शुभम लाड, निखिल तेली आदी उपस्थित होते. गावात मावा व दारू विक्री होत आहे. याबाबत सक्त ताकीद दिली असून, जिल्हा प्रशासनाला कल्पना देऊन संबंधित लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा नलावडे यांनी दिला आहे.