मुकादमाकडून शेतकऱ्यास पावणेआठ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:29 IST2021-02-09T04:29:57+5:302021-02-09T04:29:57+5:30

सांगली : ऊसतोड मजुरांचा पुरवठा करण्याच्या बहाण्याने मुकादमाकडून अंकली (ता. मिरज) येथील शेतकऱ्याची सात लाख ७६ हजारांची फसवणूक करण्यात ...

Ganda of Rs | मुकादमाकडून शेतकऱ्यास पावणेआठ लाखांचा गंडा

मुकादमाकडून शेतकऱ्यास पावणेआठ लाखांचा गंडा

सांगली : ऊसतोड मजुरांचा पुरवठा करण्याच्या बहाण्याने मुकादमाकडून अंकली (ता. मिरज) येथील शेतकऱ्याची सात लाख ७६ हजारांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी गुणंधर जिवंधर चौगुले (वय ६८) यांनी तिघांविरोधात सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे.

राजेंद्र भुसा कांबळे (रा. पाचेगाव ताडा, ता. गेवराई, जि. बीड), मारुती म्हाळाप्पा मिसाळ (रा. आसंगी, ता. जत), संजय हरिबा राठोड (रा. ओढोणी, लमानतांडा, जि. बीड) अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी चौगुले यांच्या ऊसतोडीसाठी मजूर पुरवतो म्हणून संशयित कांबळे, मिसाळ आणि राठोड यांनी दि. १५ सप्टेंबर ते ३० ऑक्टोबर या कालावधीत वारंवार धनादेश आणि रोखीने सात लाख ७६ हजार रुपये घेतले होते. चौगुले यांनी एक लाख रुपये रोख आणि उर्वरित रक्कम धनादेशाने त्यांना दिली होती. मात्र, संशयितांनी पैसे घेऊनही ऊसतोडणी, भरणीकरिता कामगार पुरवले नाहीत. त्यानंतर, चौगुले यांनी पैसे परत मागितले असता, ते देण्यासही टाळाटाळ करण्यात येत होती.

वारंवार पैशांची मागणी करूनही पैसे परत मिळत नसल्याने चौगुले यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी ग्रामीण पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

Web Title: Ganda of Rs