गलाई बांधवांनी केरळात जोपासली मराठी संस्कृती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:17 IST2021-03-30T04:17:28+5:302021-03-30T04:17:28+5:30
विटा : केरळ राज्यातील पतन्तिठ्ठा, आडूर यासह अन्य शहरांत मराठी गलाई व्यावसायिक बांधवांनी रविवारी होळी सणाला कोरोना विषाणूची प्रतीकात्मक ...

गलाई बांधवांनी केरळात जोपासली मराठी संस्कृती!
विटा : केरळ राज्यातील पतन्तिठ्ठा, आडूर यासह अन्य शहरांत मराठी गलाई व्यावसायिक बांधवांनी रविवारी होळी सणाला कोरोना विषाणूची प्रतीकात्मक होळी केली. महाराष्ट्रावर यावर्षीही येत असलेले कोरोना संकट दूर होण्यासाठी प्रार्थना केली.
सांगली जिल्ह्यातील खानापूर, तासगाव, आटपाडी, कडेगाव तसेच सातारा जिल्ह्यातील खटाव, माण तालुक्यातील अनेक मराठी बांधव गेल्या अनेक वर्षांपासून केरळसह देशाच्या सर्व राज्यांत सोने-चांदी व्यवसायानिमित्त स्थायिक झाले आहेत. हजारो मैल दूर असले, तरी या मराठी बांधवांनी महाराष्ट्रीयन संस्कृती, सण, उत्सव जोपासले आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून केरळच्या पतन्तिठ्ठा जिल्हा मराठा वेल्फेअर असोसिएशनचे प्रमुख सुभाष पाटील, पोपट शिंदे, मोहन पाटील यांच्यासह मराठी बांधवांनी आडूर शहरात होळी सण साजरा करून कोरोना विषाणूचे प्रतीकात्मक दहन केले. यावेळी महाराष्ट्रावर आलेले कोरोनाचे संकट दूर व्हावे, यासाठी प्रार्थना केली. यावेळी रोहित पाटील, निखिल पाटील, सरोज पाटील, गणेश कुर्लीकर, उत्तम गोरड, तानाजी धनवडे, रमेश धनवडे, सुरेश सुर्वे, सचिन पाटील, प्रशांत पाटील, सौ. शोभा पाटील, सौ. सुजाता शिंदे, शांता गोरड, वैशाली पाटील, अरुणा पाटील उपस्थित होते.
फोटो - २९०३२०२१ - विटा-केरळ होळी : केरळ राज्यातील आडूर येथे स्थायिक झालेल्या मराठी गलाई बांधवांनी रविवारी आडूर येथे होळी पेटवून कोरोनाचे संकट दूर व्हावे, यासाठी प्रार्थना करीत कोरोना संसर्गाचे दहन केले.