जवान दशरथ पाटील यांच्यावर आज अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:35 IST2021-06-09T04:35:19+5:302021-06-09T04:35:19+5:30
दशरथ पाटील जम्मूच्या अखनूर सेक्टरमध्ये कार्यरत होते. सोमवारी सकाळी अखनूर जम्मू (केएनटी) च्या खौर तालुक्यातील जोगवानच्या नथू टिबा भागात ...

जवान दशरथ पाटील यांच्यावर आज अंत्यसंस्कार
दशरथ पाटील जम्मूच्या अखनूर सेक्टरमध्ये कार्यरत होते. सोमवारी सकाळी अखनूर जम्मू (केएनटी) च्या खौर तालुक्यातील जोगवानच्या नथू टिबा भागात नियंत्रण रेषेवर दशरथ पाटील यांचे युनिट गस्त घालत होते. गस्त घालताना दशरथ पाटील पाय घसरून पडले, यावेळी कपाळावर गोळी लागून त्यांचा मृत्यू झाला.
सोमवारी जवान दशरथ पाटील यांचे बंधू तुकाराम पाटील यांना फोनवरून ही माहिती सैन्य दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली होती. ही बातमी समजल्यापासून वडगाव आणि तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, तालुका प्रशासन व वडगाव ग्रामपंचायतीने जवान दशरथ पाटील यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याच्या दृष्टिकोनातून तयारी पूर्ण केली आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर अंत्यविधी वेळी गर्दी होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रशासनाला देण्यात आले आहेत.