करोली एम येथे जवानावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:25 IST2021-03-08T04:25:35+5:302021-03-08T04:25:35+5:30

मिरज : (करोली एम, ता. मिरज) येथील जवान उमेश चंद्रकांत पाटील यांच्या पार्थिवावर रविवारी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात ...

Funeral at Jawali at Karoli M | करोली एम येथे जवानावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

करोली एम येथे जवानावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

मिरज : (करोली एम, ता. मिरज) येथील जवान उमेश चंद्रकांत पाटील यांच्या पार्थिवावर रविवारी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

१७ गार्ड बटालियन बिकानेर (राजस्थान) येथे हवालदार पदावर कार्यरत उमेश पाटील यांचा शनिवारी दिल्लीत आकस्मिक मृत्यू झाला. रविवारी दुपारी उमेश पाटील यांचे पार्थिव कराेली एम येथे आणण्यात आले. गावातून सजविलेल्या वाहनातून अंत्ययात्रा काढून लष्करी इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

उमेश पाटील १९ वर्षांपूर्वी १७ गार्ड बटालियनमध्ये भरती झाले होते. लष्करात कर्तव्य बजावत असताना शुक्रवारी त्यांची प्रकृती अत्यवस्थ बनली. तात्काळ त्यांना बिकानेर येथील सैनिक रुग्णालयात व तेथून दिल्लीतील सैनिक रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

उमेश पाटील यांचे पार्थिव रविवारी सकाळी पुण्यात व तेथून दुपारी कराेली एम येथे आणण्यात आले. तिरंग्यातील त्यांचा मृतदेह पाहून आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी व कुटुंबीय शोकसागरात बुडाले. त्यांच्या आकस्मिक मृत्यूने गावातील व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.

Web Title: Funeral at Jawali at Karoli M