चित्रविक्रीतून संकलित केलेला निधी शासनाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:31 IST2021-02-05T07:31:06+5:302021-02-05T07:31:06+5:30
सांगली ०१ : रंगावलीकार आदमअली मुजावर यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या हस्ते शासनाला मदतीचा धनादेश सुपुर्द केला. यावेळी ...

चित्रविक्रीतून संकलित केलेला निधी शासनाला
सांगली ०१ : रंगावलीकार आदमअली मुजावर यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या हस्ते शासनाला मदतीचा धनादेश सुपुर्द केला. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाकाळात व्यक्तिचित्रे रेखाटून त्यांची विक्री करून संकलित झालेला ५१ हजारांचा निधी आरग (ता. मिरज) येथील रंगावलीकार आदमअली मुजावर यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याकडे सुपुर्द केला.
आदमअली मुजावर हे कळंबीतील अजितराव घोरपडे विद्यालयात कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. रांगोळीच्या माध्यमातून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवणारे पहिले भारतीय आहेत. कोरोनाकाळात त्यांनी अनेक व्यक्तिचित्रे रेखाटली होती. त्यांची विक्री करून त्यांनी जमा झालेला ५१ हजारांचा निधी शासनाकडे सुपुर्द केला. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी उपस्थित होते.