खानापूर तालुक्यात दलित वस्तीसाठी सव्वातीन काेटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:17 IST2021-03-30T04:17:12+5:302021-03-30T04:17:12+5:30
विटा : आमदार अनिल बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली खानापूर मतदारसंघाचा विकास अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून ...

खानापूर तालुक्यात दलित वस्तीसाठी सव्वातीन काेटींचा निधी
विटा : आमदार अनिल बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली खानापूर मतदारसंघाचा विकास अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून खानापूर तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्यांच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यात समाजकल्याण विभागाच्या वतीने दलित वस्ती सुधार योजनेतून तीन कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती जि.प.चे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी दिली.
सुहास बाबर म्हणाले, खानापूर मतदारसंघात मागेल त्या गावांना विकासकामे हे नियोजन राबवून आ. बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाची घौडदोड सुरू आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावातील दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत रस्ते, स्ट्रीय लाइट, पेव्हिंग्ज ब्लॉक आदी कामांना प्राधान्य देऊन मागणीप्रमाणे चांगल्या दर्जाचे काम करण्यात येणार आहे.
खानापूर तालुक्यात अनेक गावांसाठी जि.प. सदस्या नीलम सकटे, सुलभा आदाटे यांच्या पाठपुराव्यामुळे दलित वस्ती सुधार योजनेतून तीन कोटी ३० लाखांचा भरघोस निधी मिळाला आहे. त्यासाठी समाजकल्याण सभापती प्रमोद शेंडगे यांचे सहकार्य मिळाले. आगामी काळातही प्रत्येक गावात विकासकामे उभे करण्यासाठी प्रयत्नशील असून त्यासाठी सर्वांनी गट-तट बाजूला ठेवून विकासासाठी एकत्रित यावे, असे आवाहन माजी जि.प. उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी केले.
फोटो - २९०३२०२१-विटा-सुहास बाबर. यांचा फोटो वापरणे.