आष्टा माळी समाज स्मशानभूमीस निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:24 IST2021-03-14T04:24:12+5:302021-03-14T04:24:12+5:30

आष्टा : आष्टा येथील लिंगायत माळी समाजाच्या स्मशानभूमीसाठी खासदार धैर्यशील माने यांनी जिल्हा नियोजन समितीतून १० लाख निधी मंजूर ...

Funding for Ashta Mali Samaj Cemetery | आष्टा माळी समाज स्मशानभूमीस निधी

आष्टा माळी समाज स्मशानभूमीस निधी

आष्टा : आष्टा येथील लिंगायत माळी समाजाच्या स्मशानभूमीसाठी खासदार धैर्यशील माने यांनी जिल्हा नियोजन समितीतून १० लाख निधी मंजूर केला आहे, अशी माहिती आष्टा पालिकेतील विरोधी पक्षनेते वीर कुदळे यांनी दिली.

माळी समाज स्मशानभूमीत पेविंग ब्लॉक बसविण्यासाठी आष्टा पालिकेचा ठराव मंजूर करून प्रशासकीय मान्यता घेतली. हा ठराव जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावा अशी मागणी मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांच्याकडे केली आहे.

खासदार धैर्यशील माने यांच्या आष्टा दाैऱ्यावेळी वीर कुदळे, महिला आघाडीप्रमुख अर्चना माळी, शिवसेना शहरप्रमुख राकेश आटूगडे, उपशहर प्रमुख गणेश माळी, शहर संघटक नंदकुमार आटूगडे यांनी या स्मशानभूमीतील पेविंग ब्लॉकसाठी निधीची मागणी केली होती. खासदार धैर्यशील माने यांनी मागणी मान्य केली आहे.

Web Title: Funding for Ashta Mali Samaj Cemetery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.