आटपाडीसाठी सव्वा पाच कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:51 IST2021-03-04T04:51:43+5:302021-03-04T04:51:43+5:30

ते म्हणाले की, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली कामे सुरू आहेत. तालुक्यात आडवा-आडवीचे राजकारण ...

A fund of Rs | आटपाडीसाठी सव्वा पाच कोटींचा निधी

आटपाडीसाठी सव्वा पाच कोटींचा निधी

ते म्हणाले की, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली कामे सुरू आहेत. तालुक्यात आडवा-आडवीचे राजकारण न करता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून विकासासाठी काम केले. रस्त्यासाठी साडेतीन कोटी रुपये, जनसुविधा एक कोटी, तीर्थक्षेत्र विकासासाठी २४ लाख, खरसुंडी आणि नेलकरंजी पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी साडेसात आणि दहा लाख रुपये आणि नागरी सुविधामधून ४० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.

ते म्हणाले, विठलापूर-खवासपूर रस्ता, आटपाडी सागर मळा, पांढरेवाडी ते बोंबेवाडी रस्ता, विभूतवाडी ते गुळेवाडी रस्ता, माडगुळे ते नसले वस्ती रस्ता, पारेकरवाडी, जांभुळणी ते घरनिकी रस्ता, उंबरगाव ठोंबरे वस्ती रस्ता, करगणी शेटफळे रस्ता, करगणी शेटफळे ते चिंध्या पीर रस्ता, झरे काळचौंडी हद्द रस्ता, आवळाई पिसेवाडी रस्ता, बोंबेवाडी जोडगेवस्ती रस्ता यासह विविध मंदिरांसाठीही विकास निधी मंजूर झाला आहे.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य अरुण बालटे, जिल्हा परिषद सदस्य मोहन रणदिवे, उपसभापती दादासाहेब मरगळे, माजी उपसभापती रूपेशकुमार पाटील, जयवंत सरगर आणि विष्णू अर्जुन उपस्थित होते.

Web Title: A fund of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.