तासगाव क्रीडा संकुलासाठी तीन कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:31 IST2021-09-14T04:31:36+5:302021-09-14T04:31:36+5:30

तासगाव : तासगाव येथील तासगाव तालुका क्रीडा संकुलासाठी राज्य क्रीडा व युवक कल्याण विभागाने ३ कोटींचा ...

Fund of Rs 3 crore for Tasgaon Sports Complex | तासगाव क्रीडा संकुलासाठी तीन कोटींचा निधी

तासगाव क्रीडा संकुलासाठी तीन कोटींचा निधी

तासगाव : तासगाव येथील तासगाव तालुका क्रीडा संकुलासाठी राज्य क्रीडा व युवक कल्याण विभागाने ३ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती आमदार सुमनताई पाटील यांनी दिली. क्रीडा संकुलासाठी ६१ कोटींचा प्रस्ताव दिला असून त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्य क्रीडा व युवक कल्याण विभागाने राज्यातील ३५ तालुक्यांत तालुका क्रीडा संकुल योजनेतून निधी दिला आहे, त्यामध्ये तासगाव तालुका क्रीडा संकुलासाठी सर्वाधिक ३ कोटींचा निधी देण्यात आला आहे. हा निधी देण्याचे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निधीची उपलब्धता होताच कामाचे भूमिपूजन करण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले.

तासगाव शहरात सध्या असलेल्या क्रीडा संकुलामध्ये ८ एकर जागा आहे. सध्या या ठिकाणी ४०० मीटर्सचा ट्रॅक तयार असून यावर्षी या क्रीडा संकुलासाठी आणखी ३ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. लवकरच या कामाला सुरुवात करत असल्याची माहिती त्यांनी दिली.

राज्य शासनाने ६१ कोटी १६ लाख ११ हजार रुपये खर्चाच्या कामाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामध्ये तासगाव तालुका क्रीडा संकुलात ४०० मीटर्स धावनपथ ( सिंथेटिक ट्रॅक) व फुटबॉल ग्रास मैदानासह, २ व्हॅालीबॉल कोर्ट आसन व्यवस्थेसह, ३ मजली वस्तीगृह, इनडोअर जिम्नॅशिअम हॉल, प्रसाधनगृह, चेंजिग रुम, व्हीआयपी लाउंज, प्रेक्षक गॅलरी, कमर्शियल गाळे यांचा समावेश आहे.

Web Title: Fund of Rs 3 crore for Tasgaon Sports Complex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.