लंगरपेठ शाळेस दीड लाखाचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:26 IST2021-02-05T07:26:18+5:302021-02-05T07:26:18+5:30
लंगरपेठ येथील जिल्हा परिषद शाळेची राज्यस्तरावर माॅडेल स्कूलसाठी कवठेमहांकाळ तालुक्यातून एकमेव निवड झाली आहे. या माॅडेल स्कूल अंतर्गत ...

लंगरपेठ शाळेस दीड लाखाचा निधी
लंगरपेठ येथील जिल्हा परिषद शाळेची राज्यस्तरावर माॅडेल स्कूलसाठी कवठेमहांकाळ तालुक्यातून एकमेव निवड झाली आहे. या माॅडेल स्कूल अंतर्गत नावीन्यपूर्ण बदल होणार आहेत. यासाठी लागणारा निधी हा जिल्हा परिषद व लोकसहभागातून करावयाचा आहे. यासाठी लंगरपेठ शाळेसाठी लोकांनी देणग्या देऊन सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच महेश पवार यांनी केले होते. याला प्रतिसाद देत शिंदे दांम्पत्याने निधी दिला आहे. याबद्दल सरपंच व ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. यावेळी उपसरपंच यशवंत शिंदे, मुख्याध्यापक शिवाजी कोळेकर, दादासाहेब कोळेकर, शारदा घोरपडे, सुषमा गुरव, बाबासाहेब शिंदे, संजय गरड उपस्थित होते.
फोटो : ३०ढालगाव१
फोटो ओळ : लंगरपेठ (ता. कवठेमहांकाळ) येथील जिल्हा परिषद शाळेस सीताराम शिंंदे व शकुंतला शिंदे यांनी दिलेला निधी सरपंच महेश पवार यांनी स्वीकारला.