शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: चांदोली प्रकल्पग्रस्त वसाहतींना ४ कोटींचा निधी मंजूर, प्रकल्पग्रस्तांच्या मागणीला यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 15:26 IST

कुपवाड : चांदोली अभयारण्य बाधित प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन कायद्यानुसार डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेंतर्गत प्रकल्पग्रस्त १६ वसाहत मधील रहिवाशांना मूलभूत ...

कुपवाड : चांदोली अभयारण्य बाधित प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन कायद्यानुसार डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेंतर्गत प्रकल्पग्रस्त १६ वसाहत मधील रहिवाशांना मूलभूत सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी शासनाने प्रत्येक वसाहतींना २५ लाख रुपयांप्रमाणे ४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीमुळे प्रकल्पग्रस्तांच्या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे, अशी माहिती प्रकल्पग्रस्त कार्यकर्ते ज्ञानदेव पवार यांनी दिली.चांदोली अभयारण्य बाधित प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्त व कार्यकर्ते यांनी वनविभागाचे अधिकारी, महसूल अधिकारी, शासनाकडे गेली अनेक वर्षे पाठपुरावा करीत होते. चांदोली अभयारण्य बाधित प्रकल्पग्रस्त सर्व वसाहतीमध्ये जनवन योजना समित्या स्थापन केल्या होत्या, तसा प्रस्ताव वनविभागाकडे सादर केला होता.वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजना मंजूर व निधी प्राप्त होण्यासाठी शासनाकडे मागणी केली होती. प्रकल्पग्रस्तांच्या मागणीसाठी अनेक जणांनी प्रयत्न केले होते, अखेर त्या मागणीच्या पाठपुराव्याला यश आले. शासनाने १६ वसाहत मधील रहिवाशांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी ४ कोटींचा निधी मंजूर केला आहे. प्रकल्पग्रस्त प्रतिनिधी राम सावंत, शंकर लोखंडे, ज्ञानदेव पवार, सुरेश जाधव, दीपक सोनवणे, दीपक वाघमारे, लक्ष्मण सावंत, अरविंद पाटील, मारुती रेवळे, मिथुन पवार, धाकलू अनुसे यासह अनेकांनी प्रयत्न केले होते.

टॅग्स :Sangliसांगली