शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता राखणाऱ्या महाराष्ट्रातील १७ खासदारांसाठी तरी निधी द्या; विशाल पाटील लोकसभेत बरसले!

By अशोक डोंबाळे | Updated: July 29, 2024 22:16 IST

महाराष्ट्र गीताच्या ओळी गात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी खासदारांवर टोलेबाजी.

अशोक डोंबाळे/सांगली, लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : संसदेच्या अधिवशेनात सोमवारी खासदार विशाल पाटील यांनी महाराष्ट्र गीताच्या ओळी गात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी खासदारांवर टोलेबाजी केली. ते म्हणाले, ‘दारिद्र्यांच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा.’ इतिहास साक्षी आहे, दिल्लीचे तख्त राखण्याची जबाबदारी महाराष्ट्र घेत होता, घेत आहे आणि घेत राहील. केंद्रातील सरकार सलामत राखण्याचे काम तुमच्या १७ खासदारांनी केले आहे. त्यांसाठी तरी केंद्राने निधी देण्याची गरज होती, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

विशाल पाटील पुढे म्हणाले, आम्ही विरोधी पक्षाचे खासदार आहोत. तुम्ही आमच्याकडे पाहू नका, पण तुमचे केंद्रातील सरकार सत्तेवर आणणाऱ्या महाराष्ट्रातील 'त्या' १७ खासदारांकडे पाहून तरी निधी द्या. मला त्यांचे हसरे चेहरे पाहून काही ओळी सुचतात, ‘आज तुम जो इतना मुस्कुरा रहे हो, क्या दर्द है जो छुपा रहे हो.’ त्यांना चिंता आहे, त्यांच्या मतदार संघात जाऊन ते सांगणार काय? अर्थसंकल्पातून काय मिळाले?’’ ते म्हणाले, ‘‘कुबड्या घेऊन चालणारे हे सरकार आहे. ते देश बुडवू नये, एवढी अपेक्षा आहे. शेतकरी कर्जमाफी, महागाई नियंत्रण, ईपीएस पेन्शन, भूमिहीन शेतकरी सन्मान योजना, खते व बियाण्यांवर जीएसटी नको या सगळ्या मागण्या तुम्ही अमान्य केल्या. फूड सबसिडीवरील निधी कमी केला. खतांचे अनुदान कमी केले. घरांसाठी फक्त ५ टक्के जादा तरतूद केली. नव्या योजनांचा फक्त उल्लेख करता, त्या काय आहेत, ६० हजार कोटी कुठे जाणार, हे स्पष्ट का सांगत नाहीत. ‘बोलाचीच कढी, बोलाचाच भात, जेवूनिया तृप्त कोण झाला’, अशी अवस्था आहे. ज्या राज्याचा जीडीपी घसरला तिथे भाजप हरला आहे. असेच अर्थ धोरण राहिले तर भाजपचे पतन निश्चित आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ते हरयाणा आणि महाराष्ट्रात पराभूत होणार आहे, हे नक्की आहे.

टॅग्स :vishal patilविशाल पाटीलcongressकाँग्रेसSangliसांगली