शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

शिक्षण सेवकांना दिवाळीची भेट, ऑक्टोबरपासून मिळणार फूल पगार; राज्यात पहिलाच यशस्वी प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 13:11 IST

हे सर्व शिक्षक अत्यंत तुटपुंज्या वेतनावर काम करत होते.

सांगली : जिल्ह्यातील ४५० शिक्षण सेवकांपैकी चक्क ३८३ शिक्षण सेवकांना दि. १ ऑक्टोबरपासून फूल पगार देऊन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिवाळीची भेट दिली आहे. राज्यातील पहिलाच यशस्वी प्रयोगाबद्दल शिक्षण सेवकांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.जिल्हा परिषद शाळेत ४५० शिक्षकांनी शिक्षण सेवक म्हणून नोकरीला सुरुवात केली होती. हे सर्व शिक्षक अत्यंत तुटपुंज्या ६००० वेतनावर काम करत होते. या शिक्षकांना कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविताना कसरत करावी लागत होती. या शिक्षण सेवकांचा दि. ३० सप्टेंबर २०२२ मध्ये तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाला आहे. या पात्र ३८३ शिक्षण सेवकांना दि. १ ऑक्टोबरपासून पूर्ण पगार मिळणार आहे.जिल्ह्यातील ३१ शिक्षण सेवकांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने अपात्र ठरले आहेत. मात्र जात वैधता प्रमाणपत्र सादर करताच त्यांनाही नियमित करण्यात येणार आहे. एक शिक्षण सेवक बेकायदेशीर गैरहजर असल्यामुळे त्यांचा प्रस्ताव प्रलंबित आहे. तसेच सात शिक्षण सेवकांचा तीन वर्षांचा कालावधी पूर्ण नसल्यामुळे त्यांना नियमित शिक्षक म्हणून नियुक्ती मिळाली नाही. या शिक्षकांच्या फायली तयार असून त्यांचाही कालावधी पूर्ण होताच नियमितीकरणाचे आदेश त्यांना मिळणार आहे.

शिक्षक संघटनांकडून प्रशासनाचे कौतुकराज्यात प्रथमच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डुडी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस प्रयत्न केले. म्हणूनच एकाच वेळी चक्क ३८३ शिक्षण सेवकांना नियमितीकरणचे आदेश मिळाले आहेत. या शिक्षकांना कोणताही आर्थिक त्रासही झाला नसून अशा पद्धतीने प्रथमच नियुक्तीचे आदेश दिल्याबद्दल प्रशासनाने अभिनंदन, असे संदेश शिक्षक संघटनांनी सोशल माध्यमांवर फिरत होते.

टॅग्स :SangliसांगलीTeacherशिक्षक