शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: मोक्का कारवाईतील फरारी संशयितास कोल्हापुरात अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 17:12 IST

पोलिस उपअधीक्षकांच्या पथकाची कारवाई

इस्लामपूर : इस्लामपूर शहरातील टोळी युद्धातून एकाच्या खुनाचा प्रयत्न केल्यानंतर मोक्का कायद्याच्या कचाट्यात अडकूनही ९ महिन्यांपासून फरारी राहिलेल्या हल्लेखोरास पोलिस उपअधीक्षक अरूण पाटील यांच्या विशेष पथकाने कोल्हापुरातून अटक केली.गुरुदत्त राजेंद्र सुतार (वय १९, रा. इस्लामपूर) असे या फरारी संशयिताचे नाव आहे. ज्ञानेश पवारच्या संघटित टोळीतील सुतार हा सदस्य होता. पवार याच्या टोळीने गेल्या फेब्रुवारी महिन्यात गवंडी टोळीतील विनोद उर्फ बाल्या रामचंद्र माने-वडार याच्यावर एडका, परळी, चाकू आणि कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांनी हल्ला चढवत त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्यात बाल्या वडार हा गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी त्याची आई सुरेखा रामचंद्र माने-वडार हिने पोलिसात फिर्याद दिली होती.या घटनेनंतर पोलिसांनी ज्ञानेश पवार या म्होरक्यासह इतर हल्लेखोरांना अटक केली होती. मात्र, गुरुदत्त सुतार हा तेव्हापासून पोलिसांना गुंगारा देत फिरत होता. यादरम्यान पवार याच्या टोळीविरुद्ध विशेष पोलिस महानिरीक्षकांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याखाली (मोक्का) कारवाई केली होती. त्यामध्ये गुरुदत्त सुतार याचाही समावेश आहे.दरम्यान, पोलिस उपअधीक्षक अरूण पाटील यांनी विशेष पथकाला सुतार याच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिले होते. पथकातील हवालदार दीपक ठोंबरे यांना गुरुदत्त सुतार हा कोल्हापूर येथील रेल्वेस्थानक परिसरात असल्याची माहिती मिळाल्यावर सहायक पोलिस निरीक्षक अल्पेश लावंड, उपनिरीक्षक सतीश मिसाळ, दीपक ठोंबरे, संदीप सावंत, प्रशांत देसाई, मंगेश गुरव यांच्या पथकाने रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून सुतार याला पळून जाण्याची संधी न देता बुधवारी पहाटे ३ च्या सुमारास जेरबंद केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli MCOCA Fugitive Arrested in Kolhapur After Nine Months

Web Summary : A fugitive involved in an attempted murder case and wanted under MCOCA, Guru Dutt Sutar, was arrested in Kolhapur after nine months on the run. He was a member of the Gyanesh Pawar gang, which attacked Vinod alias Balya Mane-Wadar. Police captured him near the railway station.