फरार आरोपीस कवठेमहांकाळ येथे अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:19 IST2021-01-01T04:19:21+5:302021-01-01T04:19:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : दरोड्याच्या गुन्ह्यातील फरारी आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेेषण शाखेच्या पथकाने अटक केली. गेल्या एक वर्षापासून ...

फरार आरोपीस कवठेमहांकाळ येथे अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : दरोड्याच्या गुन्ह्यातील फरारी आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेेषण शाखेच्या पथकाने अटक केली. गेल्या एक वर्षापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. रवींद्रनाथ काशिनाथ जाधव (वय २७, रा. डफळापूर, ता. जत) असे संशयिताचे नाव आहे.
घरफोडीसह अन्य गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक कवठेमहांकाळ येथे गस्तीवर होते. यावेळी कवठेमहांकाळ बसस्थानकाजवळ रवींद्र हा थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने छापा मारून त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे व पोलीस ठाण्याकडील माहितीमध्ये एका दरोडयाच्या गुन्ह्यात तो हवा असल्याची माहिती मिळाली. रवींद्र हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर दरोड्यासह बेकायदा शस्त्र बाळगणे, विक्री करणे आदी गुन्हे दाखल आहेत.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिलीप ढेरे, संदीप गुरव, राजू शिरोळकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
-----------------------------------
फोटो ३१ रविंद्र जाधव नावाने एडीटोरियलवर