कवलापूरमध्ये फळविक्रेत्यास लोखंडी सळीने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:29 IST2021-03-23T04:29:11+5:302021-03-23T04:29:11+5:30

सांगली : मिरज तालुक्यातील कवलापूर येथे फळविक्रेत्यास सळीने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी रुबीन गुलाब मोहिते (वय ५४, रा. कवलापूर) ...

Fruit seller beaten with iron rod in Kavalapur | कवलापूरमध्ये फळविक्रेत्यास लोखंडी सळीने मारहाण

कवलापूरमध्ये फळविक्रेत्यास लोखंडी सळीने मारहाण

सांगली : मिरज तालुक्यातील कवलापूर येथे फळविक्रेत्यास सळीने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी रुबीन गुलाब मोहिते (वय ५४, रा. कवलापूर) यांनी राजू तानाजी मोहिते (रा. कवलापूर) याच्याविरोधात सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादी मोहिते फळविक्रेते असून, ते गावात कुटुंबियांसह राहतात. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ते घरासमोर थांबले होते. यावेळी त्यांच्या घराशेजारी राहणारा राजू मोहिते हा तेथे आला. त्याने रुबीन यास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी भावाला बोलावून घेतले. यावेळी संशयित राजूला घरी जाण्यास सांगत असतानाच त्याने लोखंडी सळी फिर्यादी मोहिते यांच्या डोक्यात घातली. रक्तस्त्राव सुरू झाल्याने जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांनी ग्रामीण पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

Web Title: Fruit seller beaten with iron rod in Kavalapur