शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सांगली लोकसभेसाठी होणार मैत्रीपूर्ण लढत, महाआघाडीच्या उद्याच्या बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2024 11:36 IST

काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते आक्रमक

सांगली : सांगली लोकसभा निवडणुकीत मैत्रीपूर्ण लढतीसाठी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीने हिरवा कंदील दाखवला आहे. पण, महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची रविवार, दि. ३१ मार्च रोजी बैठक असून, यामध्ये सांगलीत मैत्रीपूर्ण लढतीबाबत चर्चा होणार आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी परवानगी दिली, तरच सांगलीत मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते, असे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे मत आहे.सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत सांगली, भिवंडी, मुंबई दक्षिण मध्य तसेच इतर दोन जागांवर चर्चा झाली. गेल्या अनेक दिवसांपासून मविआच्या बैठकीत या जागांवरून चर्चा सुरू आहे. सांगलीच्या जागेवर उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. त्यावरून काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामध्येच सांगली लोकसभेची जागा सोडण्याबाबत चर्चा होत होती. पण, या चर्चेत सध्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सहभाग घेतला आहे. नाना पटोले आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगलीत मैत्रीपूर्ण लढतीसाठी आम्ही तयार आहोत, अशी घोषणा केली आहे.

मुकुल वासनिक यांचा पुढाकार..काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक यांनीही सांगलीत मैत्रीपूर्ण लढतीसाठी प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन जिल्ह्यातील नेत्यांना दिले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची रविवार, दि. ३१ मार्च रोजी बैठक होत आहे. या बैठकीमध्ये जागा वाटप झाल्यानंतर काही जागांवर मैत्रीपूर्ण लढती कराव्यात का? अशी चर्चा होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मैत्रीपूर्ण लढतीसाठी परवानगी दिली, तरच सांगलीत मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. अन्यथा काँग्रेसच्या उमेदवाराला थांबावे लागणार आहे.

काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते आक्रमककाँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. विश्वजित कदम, सांगली लोकसभेसाठीचे इच्छुक विशाल पाटील, जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत, शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील या नेत्यांनी सांगली लोकसभेसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. शुक्रवारीही या नेत्यांनी मैत्रीपूर्ण लढतीसाठी आम्ही सज्ज आहोत, असा संदेश काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीला दिला आहे.

टॅग्स :Sangliसांगलीlok sabhaलोकसभाcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी