महापालिकेच्या आरोग्य केंद्रात आता मोफत चाचण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:22 IST2021-02-05T07:22:19+5:302021-02-05T07:22:19+5:30
कापडणीस म्हणाले की, महापालिकेने सुरू केलेल्या मोफत चाचण्यांच्या उपक्रमामुळे गोरगरीब नागरिकांना दिलासा मिळणार आहे. महापालिकेची १० प्राथमिक आरोग्य केंद्रे, ...

महापालिकेच्या आरोग्य केंद्रात आता मोफत चाचण्या
कापडणीस म्हणाले की, महापालिकेने सुरू केलेल्या मोफत चाचण्यांच्या उपक्रमामुळे गोरगरीब नागरिकांना दिलासा मिळणार आहे. महापालिकेची १० प्राथमिक आरोग्य केंद्रे, दोन प्रसूतिगृह तसेच एक डायग्नेस्टिक सेंटर आहे. या १३ केंद्रांवर मोफत चाचण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत या चाचण्या होणार आहेत. सर्व प्रकारचे ताप, डेंग्यू आजाराचे निदान, कॅन्सर उपचार सुरू असताना आवश्यक तपासण्या, सर्व प्रकारच्या आजारांच्या निदानासाठी आवश्यक असणाऱ्या तपासण्या, किडनी आजार निदानासाठी उपयुक्त तपासण्या सर्व प्रकारच्या निदानासाठी उपयुक्त तपासण्या, प्रथिने, हृदयरोग, रक्तदाब उपचारासाठी उपयुक्त तपासण्या, स्वादुपिंडाच्या कार्याचे निदान, पोविकार, हाडातील कलियम, अतिसार अशक्तपणा, सांधेदुखी, रक्तातील साखर, थॉयराइड निदानासह जवळपास २८ विविध तपासण्या या उपक्रमांतर्गत मोफत करण्यात येणार आहेत.